पोस्ट्स

सजग समाजभानातूनच आपले व्यक्तिमत्व घडते --- प्रा. शिवराज पाटील

इमेज
  संगमेश्वरमध्ये व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान  सोलापूर (दिनांक ६ एप्रिल ) '' महाविद्यालयीन जीवनात  पारंपरिक शिक्षणाबरोबरच वाचन,चिंतन करताना समाजातील आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले की समाजभान येतं आणि समाजभानातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जातं'' असं प्रतिपादन प्रा. शिवराज पाटील यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) आयोजित ' व्यक्तिमत्व विकास ' या विषयावर आयोजित केलेल्या विशेष निमंत्रित व्याख्यानात बोलत होते.  याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. एम. मेत्री, व्यक्तिमत्व विकास विभागाचे समन्वयक रामचंद्र संगशेट्टी, मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नागरी सेवापदवी अभ्यासक्रमाच्या समन्विका डॉ. वंदना भानप प्रास्ताविक केलं या प्रास्ताविकात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व त्यांनी आधारित केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.  सत्कारानंतर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी  दिलखुलास संवाद साधला.  याप्रसंगी प्रा.डॉ.रेश्मा शेख,प्रा.डॉ.श्रीनिवास भंडारी, प्रा.रेवणसिद्ध हालोळी, प्रा.संतोष पवार,प्रा.प...

तरुणांच्या कल्पक संशोधनाला वाय ट्वेंटी तून संधी डॉ. उमेश काकडे

इमेज
  संगमेश्वरमध्ये युथ ट्वेंटीच्या स्पर्धा उत्साहात संपन्न सोलापूर( दिनांक 2 मार्च प्रतिनिधी) '' जी 20   देशांप्रमाणेच प्रगत देशातील तरुणांसोबत विचार मंथनासाठी तसेच जागतिक स्तरावरील कल्पक संशोधनात भारतीय तरुणांना संधी मिळणार आहे , महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षणाच्या व्यासपीठातून स्टार्टअपपासून - हवामान बदलापर्यंतच्या विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांना एकत्र येण्यासाठी युथ ट्वेंटी या कार्यक्रमांची आखणी भारतभर केंद्र शासन करत आहे. या संधीचा उपयोग   विज्ञान , तंत्रज्ञान , संशोधन , कला , क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांनी घ्यावा. '' असे आवाहन डॉ. उमेश काकडे (शिक्षण सहसंचालक , उच्च शिक्षण सोलापूर विभाग ) यांनी केलं. ते संगमेश्वर कॉलेज स्वायत्त इथे आयोजित केलेल्या येथे ' युथ ट्वेंटी सोलापूर समिट ' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर   नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अजित कुमार , सचिव धर्मराज   काडादी , व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापिका ज्योती काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , समन्वयक प्रा , अर्जुन चौधरी यांच...

संगमेश्वर कॉलेजमध्ये वाय- 20 अंतर्गत स्पर्धांचे आयोजन

इमेज
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम सोलापूर:  जी-20 ही जगातील प्रमुख देशांची सर्वोच्च संस्था आहे. प्रत्येक वर्षी एक वेगळ देश याचे यजमानपद भूषवितो. 2023 मध्ये भारत देशाला हे यजमानपद मिळालेले आहे.  ही अभिमानाची गोष्ट्‌ आहे. जी-20 संघटनेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात देशातील नागरिक व युवकांचा सहभाग असावा. या धर्तीवर भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने युथ म्हणजे वाय-20 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धां घेण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयातील एकएक कॉलेजची निवड करण्यात आलेली असून सोलापूर जिल्हयातून संगमेश्वर कॉलेजला हा मान मिळालेला आहे.   या उपक्रमांतर्गत दिनांक ०२ मार्च २०२३  रोजी सकाळी १०  वाजता संगमेश्वर कॉलेजमध्ये वक्तृत्व्‌, निबंधलेखन, गटचर्चा आणि  पोस्ट्‌र प्रेझेन्टेशन इत्यादी  स्पर्धा होणार आहेत. या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र्‌ शासनाच्या उच्च्‌ शिक्षण सोलापूर विभागाचे सह संचालक डॉ. उमेश काकडे, जिल्हा माहिती अधिकारी मा. सं...

पालकांचे आचरण हे मुलांसाठी अनुकरणीय असते - डॉ.गुरुराज करजगी

इमेज
    ' पालकत्व एक कला ' या विषयावर व्याख्यान                सोलापूर ( दिनांक २७ )  '' पालक हे मुलांचे आदर्श असतात त्यामुळे पालकांचे  आचरण हे मुलांसाठी अनुकरणीय असते. असे प्रतिपादन ॲकॅडमी फोर क्रिएटिव्ह टीचिंग बंगळूरूचे चेअरमन डॉ. गुरुराज करजगी यांनी केलं. सोमवारी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंच यांच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ.गुरुराज करजगी  यांचे ' पालकत्व एक कला ' या विषयावर व्याख्यान झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी अप्पासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी शिक्षणाची गरज ओळखून कर्मयोगी अप्पासाहेबांनी शैक्षणिक संस्था उभारल्या स्वतःच्या कृतीद्वारे मुलांना शिस्तीचे स्वावलंबनाचे धडे दिले. असे सांगून सोलापुरातील पालकांशी हितगुज साधण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचं त्यांनी सांगितलं.  आपल्या व्याख्यानात डॉ. करजगी यांनी अति काळजी करणारा पालक वर्ग, नि...

संगमेश्वरच्या ट्रेकर्सनी सर केला लोहगड

इमेज
  ट्रेकिंग क्लबच्यावतीने लोहगड- विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन सोलापूर, दि. २७- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व व भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर कॉलेजमधील ट्रेकिंग क्लबच्यावतीने लोहगड- विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये ९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास निंबाळकर या गाईडने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. सर्वांनी किल्ल्यांचा इतिहास जाणून चिऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत लोहगड विसापूर किल्ल्यावर शिवजयंती हात आजरी केली. पर्यावरणाचे संवर्धन करीत सर्व ट्रेकर ३४०० फूट उंच  लोहगड किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरील महादेवाचे दर्शन घेऊन सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. लोहगड किल्ल्यांवरील शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा, सोळा कोणी विहीर, गुहा, महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आदी ठिकाणे पाहून सर्व ट्रेकरनी एकमेकांना हात देत सुखरूप खाली उतरले. लोहगडाच्या जवळच त्यानंतर लोहगड...

SANGMESHWARIANS ON TREK

इमेज
  Sangameshwar college being leading in Solapur city, apart from education, it provides ample facilities to the students. Contribution by each and everyone makes it possible to achieve victory in various fields. It may be academics, sports, cultural activities, NSS ,NCC, etc. Also there are various cells and clubs in our college and one from them is the “Sangameshwar Trekking Club”. It is initiated by Dr.Prof.Shivaji Maske (Geography department) in 2020.. The motive of this club is to keep the health of stakeholders intact, as well as explore the glorious forts of our state.Till now we have completed trekking Vasota, Ratangarh & Tikona fort and this time it was Visapur, Lohagarh, Bhaje caves, Karla Caves & Ekvira temple on the list!  It was 10th Feb that we got the notice for this trek and within no time all enthusiastic trekkers grabbed their seats and the ball started rolling. We got proper preparatory instructions and following the same we hit the road by 9:30 p....

परीक्षेला जाता जाता

इमेज
दैनिक संचार , सोलापूर आवृत्तीतील लेख  परीक्षेला जाता जाता परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करण्याबरोबरच उत्तरप्रत्रिका कशी लिहितो यावर आपल्याला किती गुण मिळणार हे अवलंबून असते. अभ्यास चांगला करूनही व्यवस्थित उत्तरपत्रिका लिहिली नाही तर चांगले गुण मिळू शकत नाहीत. म्हणूनच उत्तरपत्रिका चांगली लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते. आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर ती शांतपणे वाचली पाहिजे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व्यवस्थित समजावून घेतले पाहिजे. अनेकदा प्रश्न व्यवस्थित न वाचल्याने त्याची उत्तरे आपण योग्य रीतीने लिहू शकत नाही. तसे झाल्यास आपल्याला चांगले गुण मिळू शकत नाहीत. प्रश्नपत्रिका वाचत असतानाच आपण उत्तरे कोणत्या पद्धतीने लिहिली पाहिजेत याचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. काही प्रश्नांची उत्तरे दीर्घ स्वरूपात लिहिणे आवश्यक असते; तर काहींची उत्तरे एका वाक्यात एका शब्दात लिहावयाची असतात. भाषा विषयांचे न सोडविताना काळजी घेणे आवश्यक असते. ज्या प्रश्नांकरिता अधिक गुण आहेत किंवा जे प्रश्न आपण लवकर सोडवू शकतो असेच प्रश्न हातात घेऊन ल...