सजग समाजभानातूनच आपले व्यक्तिमत्व घडते --- प्रा. शिवराज पाटील

 


संगमेश्वरमध्ये व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान 

सोलापूर (दिनांक ६ एप्रिल ) '' महाविद्यालयीन जीवनात  पारंपरिक शिक्षणाबरोबरच वाचन,चिंतन करताना समाजातील आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले की समाजभान येतं आणि समाजभानातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जातं'' असं प्रतिपादन प्रा. शिवराज पाटील यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) आयोजित ' व्यक्तिमत्व विकास ' या विषयावर आयोजित केलेल्या विशेष निमंत्रित व्याख्यानात बोलत होते.

 याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. एम. मेत्री, व्यक्तिमत्व विकास विभागाचे समन्वयक रामचंद्र संगशेट्टी, मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नागरी सेवापदवी अभ्यासक्रमाच्या समन्विका डॉ. वंदना भानप प्रास्ताविक केलं या प्रास्ताविकात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व त्यांनी आधारित केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.  सत्कारानंतर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी  दिलखुलास संवाद साधला.

 याप्रसंगी प्रा.डॉ.रेश्मा शेख,प्रा.डॉ.श्रीनिवास भंडारी, प्रा.रेवणसिद्ध हालोळी, प्रा.संतोष पवार,प्रा.प्रवीण राजगुरू, प्रा.युवराज सोलापूरे यांच्यासह नागरी सेवापदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





 या संवादाचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा आणि संगमेश्वर कॉलेजच्या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. https://youtu.be/06vAkUdw2Wk 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा