तरुणांच्या कल्पक संशोधनाला वाय ट्वेंटी तून संधी डॉ. उमेश काकडे
संगमेश्वरमध्ये युथ ट्वेंटीच्या स्पर्धा उत्साहात संपन्न
सोलापूर(
दिनांक 2 मार्च प्रतिनिधी)
'' जी 20 देशांप्रमाणेच प्रगत देशातील तरुणांसोबत विचार मंथनासाठी तसेच जागतिक स्तरावरील कल्पक संशोधनात भारतीय तरुणांना संधी मिळणार आहे, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षणाच्या व्यासपीठातून स्टार्टअपपासून - हवामान बदलापर्यंतच्या विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांना एकत्र येण्यासाठी युथ ट्वेंटी या कार्यक्रमांची आखणी भारतभर केंद्र शासन करत आहे. या संधीचा उपयोग विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांनी घ्यावा.'' असे आवाहन डॉ. उमेश काकडे (शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण सोलापूर विभाग ) यांनी केलं. ते संगमेश्वर कॉलेज स्वायत्त इथे आयोजित केलेल्या येथे 'युथ ट्वेंटी सोलापूर समिट' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अजित कुमार, सचिव धर्मराज काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापिका ज्योती काडादी,प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, समन्वयक प्रा,अर्जुन चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाले.
त्यानंतर दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य
डॉ.राजेंद्र देसाई यांनी' वाय ट्वेंटी सोलापूर समिट'चे प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार कॉलेजच्या वतीने झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना काकडे पुढे म्हणाले की,'' युवा
महोत्सवासारखेच याचे स्वरूप असून यात विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन
मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा.''
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अजित कुमार यांनी आपल्या मनोगतात क्रीडा व युवक कल्याण
संचालनालय केंद्र शासन यांच्यामार्फत हा उपक्रम महाविद्यालयातील विविध विभागातील
विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे असे सांगितले.
तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा.ऋतुराज बुवा (
राज्यशास्त्र विभागप्रमुख ) यांनी 'जी ट्वेंटी ते वाय ट्वेंटी' यामधील सद्यस्थितीतील
स्थित्यंतराचा आढावा घेत उपस्थित सर्वांना पीपीटी सादरीकरणासह सविस्तर विवेचन
केले. 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना
घेऊन 'जी २०' मध्ये आपला देश सहभागी
आहे. या संकल्पनेतील कार्यक्रमात जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील संधी आणि समस्या यात
तरुणाईला कशी संधीचे उपलब्ध निर्माण झाली आहे. आपल्या देशाचा विकसनशीलतेतून प्रगत
राष्ट्राकडे प्रवास होण्यासाठी या परिषदांमधून प्रगत राष्ट्रातील युवा नेतृत्वाचे
अनुभव कथन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ग्लोबल युथ लीडरशिप साठीचा समन्वय या
परिषदेतून नक्की साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात श्री
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी राष्ट्रीय स्तरावरील या अनोख्या
उपक्रमात राज्यातील जिल्हास्तरावरील यजमानपद संगमेश्वर कॉलेजला दिल्याबद्दल ऋण
व्यक्त केले. या उपक्रमात वक्तृत्व, पोस्टर
प्रेसेंटेशन, गटचर्चा या उपक्रमशील उपक्रमात विद्यार्थ्यांनी
सहभागी व्हावे. मार्गदर्शकांनी महाविद्यालयीन स्तरावरील सुविधांचा वापर करून
तरुणांना प्रोत्साहित करावे. असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डी.
एम. मेत्री यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पुष्पांजली मेत्री आणि प्रा.
संतोष पवार यांनी केले. तर आभार श्रेया माशाळ या विद्यार्थिनीने मानले .
युथ
ट्वेंटी सोलापूर समिटमधील स्पर्धांचे निकाल
वक्तृत्व
पोस्टर
प्रेसेंटेशन
गटचर्चा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा