संगमेश्वर कॉलेजमध्ये वाय- 20 अंतर्गत स्पर्धांचे आयोजन


भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम

सोलापूर: 

जी-20 ही जगातील प्रमुख देशांची सर्वोच्च संस्था आहे. प्रत्येक वर्षी एक वेगळ देश याचे यजमानपद भूषवितो. 2023 मध्ये भारत देशाला हे यजमानपद मिळालेले आहे.  ही अभिमानाची गोष्ट्‌ आहे. जी-20 संघटनेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात देशातील नागरिक व युवकांचा सहभाग असावा. या धर्तीवर भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने युथ म्हणजे वाय-20 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धां घेण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयातील एकएक कॉलेजची निवड करण्यात आलेली असून सोलापूर जिल्हयातून संगमेश्वर कॉलेजला हा मान मिळालेला आहे. 


 या उपक्रमांतर्गत दिनांक ०२ मार्च २०२३  रोजी सकाळी १०  वाजता संगमेश्वर कॉलेजमध्ये वक्तृत्व्‌, निबंधलेखन, गटचर्चा आणि  पोस्ट्‌र प्रेझेन्टेशन इत्यादी  स्पर्धा होणार आहेत. या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र्‌ शासनाच्या उच्च्‌ शिक्षण सोलापूर विभागाचे सह संचालक डॉ. उमेश काकडे, जिल्हा माहिती अधिकारी मा. संप्र्‌दा बिडकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा. अजित कुमार यांच्या प्रमुख उपस्थित होईल. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व्‌ स्पर्धेसाठी शेअर सामाईक भविष्य् : लोकशाही आणि शासनात युवकांचा सहभाग आणि भविष्यातील कामकाज उद्योग ४ .०  नविनता आणि २१  व्या शतकाचे कौशल्य्‌ हे विषय असून याचे  समन्व्‌यक म्हणून डॉ. ऋतूराज बुवा आणि डॉ. वंदना पुरोहित हे काम पाहणार आहेत. निबंधलेखनासाठी शांतता निर्माण आणि समेट : युध्द्‌ रहित नवीन युगात प्रवेश हा विषय देण्यात आलेला असून याचे समन्वयक म्हणून डॉ. एस.एस. गावंडे या काम पाहणार आहेत. गटचर्चेत स्वास्थ्य कल्याण आणि खेळ युवकांसाठी आराखडाहा विषय असून याचे समन्वयक प्रा. आनंद चव्हाण आहेत.  पोस्ट्‌र प्रेझेन्टेशन साठी हवामान बदल आणि आपत्ती धोका कपात: टिकाऊपणे जगण्याचे मार्ग हे विषयसूत्र देण्यात आलेले आहे. याचे समन्व्‌यक डॉ. शिवाजी मस्के करणार आहेत. या स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना दिनांक ११  मार्च २०२३  रोजी सिम्बॉयोसिस विद्यापीठ पुणे येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. 

सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन वाय- २०   हा उपक्रम यशस्वी करावा. अधिक माहितीसाठी नुडल आफिसर प्रा.अर्जुन चौधरी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य  डॉ. राजेंद्र्‌ देसाई यांनी केले आहे.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा