संगमेश्वरच्या ट्रेकर्सनी सर केला लोहगड
ट्रेकिंग क्लबच्यावतीने लोहगड- विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन
सोलापूर, दि. २७- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व व भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर कॉलेजमधील ट्रेकिंग क्लबच्यावतीने लोहगड- विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते.
या ट्रेकिंगमध्ये ९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास निंबाळकर या गाईडने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. सर्वांनी किल्ल्यांचा इतिहास जाणून चिऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत लोहगड विसापूर किल्ल्यावर शिवजयंती हात आजरी केली. पर्यावरणाचे संवर्धन करीत सर्व ट्रेकर ३४०० फूट उंच लोहगड किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरील महादेवाचे दर्शन घेऊन सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. लोहगड किल्ल्यांवरील शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा, सोळा कोणी विहीर, गुहा, महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आदी ठिकाणे पाहून सर्व ट्रेकरनी एकमेकांना हात देत सुखरूप खाली उतरले. लोहगडाच्या जवळच त्यानंतर लोहगडाच्या जवळच असलेला ३५५६ फूट उंच विसापूर किल्ल्यावर चढाई केली. त्यानंतर भाजे व कार्ले या प्राचीन बौद्ध लेण्यांना भेट देऊन लेण्यांची माहिती घेतली. क्लबचे समन्वयक डॉ. शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. प्रवीण राजगुरू, प्रा. नागराज खराडे, प्रा. शिरीष जाधव, प्रा. युवराज सोलापुरे, भारत व्हनगावडे, संतोष फुलारी, विनायक सारंगमठ, धनंजय बच्चाव यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा