पोस्ट्स

पुस्तके जीवनाची पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात - संतोष कुलकर्णी

इमेज
    कॉलेजच्या  ' ग्रंथालय दर्शन ' उपक्रमातून दुर्मिळ ग्रंथांचा परिचय सोलापूर ( दिनांक 9 ) '' पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात त्यामुळे ग्रंथालयातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचं   वाचन करणे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आद्य कर्तव्य माना .    साहित्य , कला , शिक्षण , विज्ञान , तंत्रज्ञान , संशोधन या क्षेत्रातील   अगाध ज्ञान जाणून   घेण्यासाठी वाचनाकडे वळले पाहिजे. समृद्ध ग्रंथालयातील   पुस्तके   जीवनाला दिशा देतात.   त्यातून वाचनाचा   समृद्ध संस्कार रुजतो वाढतो. व्यक्तिमत्त्व विकासात भर घालणाऱ्या आणि ज्ञानसंपन्न करणाऱ्या ग्रंथांकडे मार्गदर्शक म्हणून पहिले पाहिजे.   स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात   ग्रंथ आपल्याला तत्कालीन    स्थलकालाची माहिती देतात. '' असा दिलखुलास संवाद मार्गदर्शक या नात्याने   सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी साधत होते.   निमित्त होते   संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) कनिष्ठ विभाग हिंदी विभागाच्या वतीने   आयोजित केलेल्या ग...

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

इमेज
संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाचा उपक्रम सोलापूर प्रतिनिधी  'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;  क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.' या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे  ओळींप्रमाणे निसर्गाची  किमया पाहताना,अनुभवताना 'सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे' अशा सदाबहार पाऊस गाण्यांच्या सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी पावसावरील कवितांचा पाऊस पाडला. निमित्त होते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पाऊसगाणी सादरीकरणाचे. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला विभागप्रमुख शिवशरण दुलंगे वाणिज्य विभागप्रमुख बसय्या हणमगाव यांची उपस्थिती होती.  प्रारंभीक तांत्रिक व सादरीकरणाच्या सूचना प्रा.संतोष पवार यांनी दिल्या. प्रा.अशोक निंबर्गी यांनी मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या काव्यवाचन आणि सादरीकरण उपक्रमाची माहिती देत प्रास्ताविक केलं.उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी कविता सादर करत  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कला वाणिज...

संगमेश्वर कॉलेजमध्ये शहरस्तरीय क्रीडा शिक्षकांची सभा

इमेज
 जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शालेय शहर स्तरीय क्रीडा स्पर्धा बाबत क्रीडा शिक्षकांची सभा 170 क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत संगमेश्वर कॉलेजमध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सोलापूर मनपा क्रीडा अधिकारी एम. के .शहापुरे, संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य पी .एन. कुंटे ,त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी गणेश पवार, सत्येन जाधव, नदीम शेख, सुनील धारूरकर,तानाजी मोरे, सुप्रिया गाढवे, जयराज मुंडे, जिमखाना चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार उपस्थित होते.  याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार म्हणाले की, सोलापूरमध्ये 400 मीटर अथलेटिक्स सिंथेटिक मैदान, बॅडमिंटन हॉल त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी चार मजली वस्तीगृह वाढवण्यात येणार , स्पर्धेसाठी येणाऱ्या पंचांच्या मानधनांमध्ये तीनशे रुपये करू,क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळेचे , 100 क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा व तालुका प्रशिक्षनाचे आयोजन,स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह सुसज्ज मैदान करणे, सरत...

विद्यार्थ्यांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,डेटा सायन्स या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्या. - डॉ. पंकज डोळस

इमेज
संगमेश्वर कॉलेजमध्ये व्यवस्थापन व  संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे स्वागत सोलापूर( प्रतिनिधी)  " व्यवस्थापन आणि संगणक शास्त्रात महाविद्यालयीन जीवनात अभ्यास करताना काळ, काम आणि वेगाचे भान ठेवले तर या क्षेत्रात आपण अव्वल राहाल. त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) , क्लाऊड कम्प्युटिंग, डेटा सायन्स या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्यावा. '' असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद कॉलेज व्यवस्थापनशास्त्र आणि संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंकज डोळस यांनी केलं . ते संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, विभागप्रमुख आणि संचालिका प्रा. ज्योती काडादी, प्रा.तारा काडादी -आळंद , आदी मान्यवर उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेज (ऑटोनॉमस) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी   बोलताना डॉ.पंकज डोळस  डॉ. डोळस पुढे म्हणाले की, " माहित...

विद्यार्थ्यांनो उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे - सुवर्णा झाडे

इमेज
 संगमेश्वरमध्ये उद्योगविश्व आणि करिअर या विषयावर व्याख्यान  सोलापूर दिनांक 28 जुलै       ''कठोर मेहनत,सातत्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर आपले करिअर आपण नक्कीच उभे करू शकतो . उद्योजकता ही सध्या काळाची गरज बनली आहे. रोजगार देणारे उद्योजक निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातच दिशा ठरवली पाहिजे.उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे.त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे. उद्योग विश्वातील नवे प्रवाह,आर्थिक जोखीम  आपण  जाणून घ्या. '' असा मोलाचा सल्ला सुवर्णा झाडे -खेलबुडे यांनी दिला. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने माझं करिअर या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या 'करियर इन आंत्रप्रेन्यूरशिप' या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,  पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख बसय्या हणमगाव  यांनी आपल्या प्रास्ताविकात आर्थिक जगतात  जोखीम स्वीकारून जो नवे उद्योग उभारतो तोच या क्षेत्रामध्ये  सक्षम होऊ शकतो असे सांगत प्रास्ताविक केले. प्रा. संगीता म्हमाणे यांनी सूत्...

कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील संधीचा लाभ घ्या - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

इमेज
    संगमेश्वर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे  स्वागत  सोलापूर प्रतिनिधी  ''कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. त्यासाठी  कठोर मेहनत, सातत्यपूर्ण परिश्रम पूर्वक नियोजनाची गरज आहे.'' असे प्रतिपादन संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे यांनी केलं. कला,वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या इयत्ता अकरावीच्या  स्वागत समारंभ आणि अभिभाषण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी  कला समन्वयक - शिवशरण दुलंगे वाणिज्य विभाग समन्वयक - बसय्या हणमगाव,  विज्ञान विभाग समन्वयक - रामराव राठोड, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी उपस्थित होते.   कला शाखेतून करिअर करत असताना  कला, साहित्य, संगीत याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले करिअर आपण करू शकता.  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी   या स्पर्धा परीक्षांकडे वळताना, बँकिंग क्षेत्रातील संधीचाही लाभ घ्यावा.  विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आयआयटी, जेईइ, नीट, सीईटी या स्पर्धा परीक्षा...