संगमेश्वर कॉलेजमध्ये शहरस्तरीय क्रीडा शिक्षकांची सभा


 जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शालेय शहर स्तरीय क्रीडा स्पर्धा बाबत क्रीडा शिक्षकांची सभा 170 क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत संगमेश्वर कॉलेजमध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सोलापूर मनपा क्रीडा अधिकारी एम. के .शहापुरे, संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य पी .एन. कुंटे ,त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी गणेश पवार, सत्येन जाधव, नदीम शेख, सुनील धारूरकर,तानाजी मोरे, सुप्रिया गाढवे, जयराज मुंडे, जिमखाना चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार उपस्थित होते.


 याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार म्हणाले की, सोलापूरमध्ये 400 मीटर अथलेटिक्स सिंथेटिक मैदान, बॅडमिंटन हॉल त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी चार मजली वस्तीगृह वाढवण्यात येणार , स्पर्धेसाठी येणाऱ्या पंचांच्या मानधनांमध्ये तीनशे रुपये करू,क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळेचे , 100 क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा व तालुका प्रशिक्षनाचे आयोजन,स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह सुसज्ज मैदान करणे, सरते शेवटी 14 वर्षाखालील मुले व मुली शहर स्तर कबड्डी विजयी संघास त्यांच्यातर्फे स्पोर्ट्स शूज बक्षीस देणार असल्याचे सांगितले. 

 अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.प्रसाद कुंटे यांनी आलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांना शालेय शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि बरेचशे क्रीडा शिक्षक व जिल्हाक्रीडा अधिकारी हे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रर्माची प्रस्तावना प्रा. आनंद चव्हाण यांनी केली , उप प्राचार्य पी एन कुंटे यांनी अध्यक्षीय भाषण केले, सूत्रसंचालन प्रा. संतोष खेंडे व आभार प्रा. विक्रांत विभूते यांनी मांडले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा