पुस्तके जीवनाची पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात - संतोष कुलकर्णी

 


 कॉलेजच्या  ' ग्रंथालय दर्शन ' उपक्रमातून दुर्मिळ ग्रंथांचा परिचय

सोलापूर ( दिनांक 9 ) ''पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात त्यामुळे ग्रंथालयातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचं  वाचन करणे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आद्य कर्तव्य माना .   साहित्य, कला, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रातील  अगाध ज्ञान जाणून  घेण्यासाठी वाचनाकडे वळले पाहिजे. समृद्ध ग्रंथालयातील  पुस्तके  जीवनाला दिशा देतात.  त्यातून वाचनाचा  समृद्ध संस्कार रुजतो वाढतो. व्यक्तिमत्त्व विकासात भर घालणाऱ्या आणि ज्ञानसंपन्न करणाऱ्या ग्रंथांकडे मार्गदर्शक म्हणून पहिले पाहिजे.  स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात  ग्रंथ आपल्याला तत्कालीन   स्थलकालाची माहिती देतात. '' असा दिलखुलास संवाद मार्गदर्शक या नात्याने  सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी साधत होते.  निमित्त होते  संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) कनिष्ठ विभाग हिंदी विभागाच्या वतीने  आयोजित केलेल्या ग्रंथ दर्शन उपक्रमाचे. उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,  ग्रंथपाल विजयकुमार मुलीमनी  यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


                                                                                                                                    

                                                                            प्रारंभी  प्राध्यापक शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.  या प्रास्ताविकात या उपक्रमा वैविध्यपूर्ण उपक्रमातील बाबी स्पष्ट केल्या.  ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ कसे जतन केले जातात. त्याचं मूल्य याबद्दल त्यांनी सांगितलं.  उपप्राचार्यांनी आपल्या मनोगतात  या अभिनव उपक्रमाचे  कौतुक करत, काय वाचावं ?कसं वाचावं ? किती वाचावं ?  याविषयीचे मार्गदर्शन केले आणि  हा उपक्रम सर्वांसाठी राबवावा असे आवाहन केले.                                                                                                        

                                             वक्त्यांचा परिचय वैभवी स्वामी हिने करून दिला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता  बोरगी हिने केले.  तर आभार अमृता गुरव हिने मानले. विज्ञान विभाग प्रमुख रामराव राठोड,  ग्रंथालय कर्मचारी संजय कुंभार, आदी उपस्थित होते.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा