कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील संधीचा लाभ घ्या - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

 

 

संगमेश्वर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे  स्वागत 

सोलापूर प्रतिनिधी


 ''कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. त्यासाठी  कठोर मेहनत, सातत्यपूर्ण परिश्रम पूर्वक नियोजनाची गरज आहे.'' असे प्रतिपादन संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे यांनी केलं. कला,वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या इयत्ता अकरावीच्या  स्वागत समारंभ आणि अभिभाषण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी  कला समन्वयक - शिवशरण दुलंगे वाणिज्य विभाग समन्वयक - बसय्या हणमगाव,  विज्ञान विभाग समन्वयक - रामराव राठोड, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी उपस्थित होते.




  कला शाखेतून करिअर करत असताना  कला, साहित्य, संगीत याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले करिअर आपण करू शकता.  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी   या स्पर्धा परीक्षांकडे वळताना, बँकिंग क्षेत्रातील संधीचाही लाभ घ्यावा.  विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आयआयटी, जेईइ, नीट, सीईटी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास समोर ठेवून  परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी या दोन्ही भूमिका  पार पाडत असताना कठोर परिश्रमाबरोबर सातत्यपूर्ण नियोजन गरजेचे आहे .'' असेही ते म्हणाले.











दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या  प्रवेशासाठी  विद्यार्थी उत्सुक होते. ही उत्सुकता काल संपली  आजपासून अकरावीचे वर्ग शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात सुरू झाले. सात रस्ता सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमेश्वर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त गर्दी केली होती. आपापले वर्ग,  आस्थापना विभाग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. याच कार्यक्रमात दहावीतील गुणवंतांचा व राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने  मुलींच्या पाससाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.






                      प्रारंभी तीनही विभागातील विद्यार्थ्यांचे स्वागत झाले   संगमेश्वर गीतानंतर  संस्थेच्या चित्रफितीतून  शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला . सर्व विभाग प्रमुखांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर  पर्यवेक्षक आणि उपप्राचार्यांनी संवाद साधला.  याप्रसंगी महाविद्यालयातील  कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा