विद्यार्थ्यांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,डेटा सायन्स या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्या. - डॉ. पंकज डोळस

संगमेश्वर कॉलेजमध्ये व्यवस्थापन व  संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

सोलापूर( प्रतिनिधी) 

" व्यवस्थापन आणि संगणक शास्त्रात महाविद्यालयीन जीवनात अभ्यास करताना काळ, काम आणि वेगाचे भान ठेवले तर या क्षेत्रात आपण अव्वल राहाल. त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) , क्लाऊड कम्प्युटिंग, डेटा सायन्स या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्यावा. '' असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद कॉलेज व्यवस्थापनशास्त्र आणि संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंकज डोळस यांनी केलं . ते संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, विभागप्रमुख आणि संचालिका प्रा. ज्योती काडादी, प्रा.तारा काडादी -आळंद , आदी मान्यवर उपस्थित होते. 

संगमेश्वर कॉलेज (ऑटोनॉमस) मधील संगणक शास्त्र विभाग आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी 
 बोलताना डॉ.पंकज डोळस 

डॉ. डोळस पुढे म्हणाले की, " माहिती आणि तंत्रज्ञानातील नवे बदल आत्मसात करत विद्यार्थी उत्तम करिअर करतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मागील त्याला तंत्रशिक्षण मिळणार आहे .मोबाईल, संगणक, इंटरनेट यांचा वापर संशोधनासाठी, नवीन उपक्रमासाठी झाला तर नक्कीच फायदा होतो. सोशल मीडिया जगतामुळे माहितीची देवाण-घेवाण जलद गतीने होते. ज्ञानभाषा इंग्रजीचे महत्त्व जाणून घ्या.व्यक्तिमत्त्व विकासात इंग्रजी महत्त्वाची आहे ." 

प्रारंभी प्राध्यापिका राजश्री हुंडेकरी यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगत प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने झाला. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. याप्रसंगी  प्रा. रेखा पाटील, प्रा. बमनिंग बुक्का आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.संगीता जोगदे यांनी केलं तर प्रा.साई सुमन यांनी सर्वांचे आभार मानले.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा