विद्यार्थ्यांनो उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे - सुवर्णा झाडे


 संगमेश्वरमध्ये उद्योगविश्व आणि करिअर या विषयावर व्याख्यान

 सोलापूर दिनांक 28 जुलै  



    ''कठोर मेहनत,सातत्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर आपले करिअर आपण नक्कीच उभे करू शकतो . उद्योजकता ही सध्या काळाची गरज बनली आहे. रोजगार देणारे उद्योजक निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातच दिशा ठरवली पाहिजे.उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे.त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे. उद्योग विश्वातील नवे प्रवाह,आर्थिक जोखीम  आपण  जाणून घ्या. '' असा मोलाचा सल्ला सुवर्णा झाडे -खेलबुडे यांनी दिला. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने माझं करिअर या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या 'करियर इन आंत्रप्रेन्यूरशिप' या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,  पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे उपस्थित होते.



वाणिज्य विभाग प्रमुख बसय्या हणमगाव  यांनी आपल्या प्रास्ताविकात आर्थिक जगतात  जोखीम स्वीकारून जो नवे उद्योग उभारतो तोच या क्षेत्रामध्ये  सक्षम होऊ शकतो असे सांगत प्रास्ताविक केले.

प्रा. संगीता म्हमाणे यांनी सूत्रसंचालन केले तर यांनी प्रा. बाबासाहेब सगर आभार मानले.या प्रसंगी प्रा.रूपाली पाटील,प्रा.निनाद सपकाळ,प्रा.संतोष पवार यांच्यासह   कनिष्ठ विभागातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा