पोस्ट्स

वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. शुभांगी कुलकर्णी

इमेज
   हिंदी विभाग आयोजि वक्तृत्व स्पर्धेत सादिया शेख प्रथम सोलापूर प्रतिनिधी    '' शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून आपण सतत वाचन केले पाहिजे या वाचनातून  मनाचे भरण -पोषण तर होतेच महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळत जातात. या संदर्भातून आपले बोलणे  सहज सोपे आणि प्रभावी होऊ शकते. त्यासाठी वाचा. वाचल्याशिवाय पर्याय नाही.  सूक्ष्म निरीक्षण शक्ती ही अत्यंत महत्त्वाच आहे. वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. '' असे प्रतिपादन  शुभांगी कुलकर्णी यांनी केले. त्या  भाषा संकुलाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या  वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.  याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे , भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी आदी उपस्थित होते.                        प्रारंभी सरस्वती पूजन झाले. सरस्वती पूजनानंतर प्रा. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक  करून  अतिथींचा परिचय करून दिला.  अत...

संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी नेचर वॉक माध्यमातून जाणून घेतला सोलापूरचा इतिहास

इमेज
सोलापूर प्रतिनिधी    नेचर वॉक सारख्या उपक्रमातून  विद्यार्थ्यांनी  सोलापुरातील ऐतिहासिक वारशांचे दर्शन घेतले आणि  त्यांची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.  ही माहिती  सांगितली प्रा.गिरी सोनाली गिरी यांनी.  यामध्ये देवदूत डॉ. द्वारकानाथ कोटणीस, ऐतिहासिक इंद्रभुवन इमारत,  धनराज गिरजी हॉस्पिटल  या ठिकाणांना भेटी देत  विद्यार्थ्यांनी त्या वास्तूंची माहिती  ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.      हा     हा उपक्रम यशस्वीतेसाठी   कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे, शहाजी माने ,शंकर कोमुलवार, रंगसिद्ध पाटील, रश्मी कन्नूरकर, विठ्ठल अरबाळे यांनी परिश्रम घेतले.

संगमेश्वर कॉलेजचे सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये यश

इमेज
 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  खेळाडूंनी यश संपादन केले. मुलांमध्ये श्रावण वालीकर 46 ते 49 किलो वजन गटामध्ये  सुवर्ण पदक,  करण पवार 48 ते 52 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक, शौर्य भोसले 52 ते 56 किलो वजन गटात सुवर्ण, संगमेश्वर शिरोळकर 60 ते 64 किलो वाजन गटामध्ये सुवर्णपदक,  राज अबुटे 75 ते 80 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक, विश्वजीत महावरकर 64 ते 69 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक तर  मुलींमध्ये संस्कृती अंजिखाने 45 ते 48 किलो वजन गटात सुवर्ण पदक, पौर्णिमा पुजारी 51 ते 54 किलो वजन गटात सुवर्णपदक,  मयुरी पुजारी ASI प्रकारात कांस्य पदक पटकावून यशस्वी कामगिरी बजावली         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले     या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचि...

बँक ऑफ इंडियाला संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भेट

इमेज
सोलापूर प्रतिनिधी  बँकेतील वाणिज्य विभागातील कामकाज  समजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तक मंडळाने  बँक व्हिजिट  हा एक उपक्रम  नेमलेला आहे.  या अंतर्गत संगमेश्वर कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेस भेट दिली आणि कामकाज समजावून घेतले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या  इयत्ता ११ वी १२ वी  बँकिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या  विद्यार्थ्यांची बँक ऑफ इंडिया रेल्वे लाईन शाखा सोलापूर येथे बँक व्हिजिट झाली. याप्रसंगी बँकेचे प्रमुख  व्यवस्थापक  निर्मल पात्रा यानी बँकेतील सर्व कामकाजाची माहिती यामध्ये (Saving A/c, Current A/c, Fixed Deposits, Recurring Deposits, RTGS, NEFT, Types of Loan A/c, Cheque,Locker Facilities ) याबाबत सविस्तर माहिती सांगितली.  याप्रसंगी संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे समन्वयक  प्रा. बसय्या हणमगांव, प्रा.बाबासाहेब सगर, प्रा.निनाद सपकाळ,प्रा. रुपाली पाटील, प्रा.संगीत म्हमाणे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र बिराजदार यांनी केले. आभार प्रदर्शन बँक...

७८ वा स्वातंत्र्यदिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

इमेज
    सोलापूर दिनांक १५  ७८वा भारतीय स्वातंत्र्य दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी मान्यवरांना ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने  ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले.  त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर  तिरंग्याला सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर  एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.  प्राचार्यांनी  उपस्थितांना  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नव्याने रुजू झालेल्या नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या  प्राध्यापकांचा देखील यामध्ये सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात  नॅशनल एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये  निवड झालेल्या  कॅडेट त्वरिता खटके हिचा सन्मान करण्यात आला.  लष्करामधील निवृत्त कर्मचारी संगमेश्वर कॉलेजमध्ये कार्यरत अण्णा निंबाळकर आणि अप्पासाहेब काळे यांचाही सत्कार करण्यात आला.  स्वातंत्र...

संगमेश्वर कॉलेजमध्ये ' हर घर तिरंगा' उपक्रम

इमेज
 ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग  सोलापूर दिनांक १४    देशाच्या हरघर तिरंगा या उपक्रमामध्ये  राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थ्यांच्या सहभागातून  उस्फुर्त सहभागातून   हा उपक्रम  महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राबवण्यात आला.  प्रारंभी  संगमेश्वर पब्लिक स्कूल , ९ महाराष्ट्र बटालियन  संगमेश्वर कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ विभाग  या  विभागातील  विद्यार्थी  डी 106 या सभागृहात  एकत्रित आले.  त्यानंतर ध्वजसंहिता  कॅप्टन शिल्पा लब्बा यांनी स्पष्ट करून सांगितले. यामध्ये  राष्ट्रध्वजाचा सन्मान कशा पद्धतीने आपण राखला पाहिज आणि हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन  राष्ट्राला मानवंदना देणारा आहोत    हे स्पष्ट केले.याप्रसंगी  व्यासपीठावर  प्र.प्राचार्य  ऋतुराज बुवा,  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रमुख  प्रा. डॉ. अण्णासाहेब साखरे, ९महाराष्ट्र बटालियनचे सीटीओ तुकाराम साळुंखे आदी उपस्थित होते....