संगमेश्वर कॉलेजचे सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये यश

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  खेळाडूंनी यश संपादन केले.

मुलांमध्ये श्रावण वालीकर 46 ते 49 किलो वजन गटामध्ये  सुवर्ण पदक,  करण पवार 48 ते 52 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक, शौर्य भोसले 52 ते 56 किलो वजन गटात सुवर्ण, संगमेश्वर शिरोळकर 60 ते 64 किलो वाजन गटामध्ये सुवर्णपदक,  राज अबुटे 75 ते 80 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक, विश्वजीत महावरकर 64 ते 69 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक तर 

मुलींमध्ये संस्कृती अंजिखाने 45 ते 48 किलो वजन गटात सुवर्ण पदक, पौर्णिमा पुजारी 51 ते 54 किलो वजन गटात सुवर्णपदक,  मयुरी पुजारी ASI प्रकारात कांस्य पदक पटकावून यशस्वी कामगिरी बजावली

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले

    या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

सिकाई मार्शल आर्ट खेळाडू समवेत संस्थेच्या सचिवा ज्योती काडादी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते




 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे