संगमेश्वर कॉलेजमध्ये ' हर घर तिरंगा' उपक्रम


 ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग 

सोलापूर दिनांक १४   


देशाच्या हरघर तिरंगा या उपक्रमामध्ये  राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थ्यांच्या सहभागातून  उस्फुर्त सहभागातून   हा उपक्रम  महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राबवण्यात आला.  प्रारंभी  संगमेश्वर पब्लिक स्कूल , ९ महाराष्ट्र बटालियन  संगमेश्वर कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ विभाग  या  विभागातील  विद्यार्थी  डी 106 या सभागृहात  एकत्रित आले.  त्यानंतर ध्वजसंहिता  कॅप्टन शिल्पा लब्बा यांनी स्पष्ट करून सांगितले. यामध्ये  राष्ट्रध्वजाचा सन्मान कशा पद्धतीने आपण राखला पाहिज आणि हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन  राष्ट्राला मानवंदना देणारा आहोत    हे स्पष्ट केले.याप्रसंगी  व्यासपीठावर  प्र.प्राचार्य  ऋतुराज बुवा,  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रमुख  प्रा. डॉ. अण्णासाहेब साखरे, ९महाराष्ट्र बटालियनचे सीटीओ तुकाराम साळुंखे आदी उपस्थित होते. 

  त्यानंतर  तिरंगा रॅली करण्यात आली.  पब्लिक स्कूल संगमेश्वर कॉलेज, कर्मयोगी कै.आप्पासाहेब  काडादी चित्रकला महाविद्यालयमार्गे ही रॅली पुन्हा एकदा मैदानावर विसावली.'  भारत माता की जय ! जय हिंद ! वंदे मातरम !'  या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला.    कार्यक्रम यशस्वीतेसाठी  ९  महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश, ऍडमिरल ऑफिसर शरब बाबर,सुभेदार मेजर गनबहादुर गुरूंग,  सुभेदार बंडू गळवे  आदींचे मार्गदर्शन लाभले.  याप्रसंगी  कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे