७८ वा स्वातंत्र्यदिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

 


  सोलापूर दिनांक १५ 

७८वा भारतीय स्वातंत्र्य दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी मान्यवरांना ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने  ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले.  त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर  तिरंग्याला सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर  एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.  प्राचार्यांनी  उपस्थितांना  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नव्याने रुजू झालेल्या नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या  प्राध्यापकांचा देखील यामध्ये सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात  नॅशनल एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये  निवड झालेल्या  कॅडेट त्वरिता खटके हिचा सन्मान करण्यात आला.  लष्करामधील निवृत्त कर्मचारी संगमेश्वर कॉलेजमध्ये कार्यरत अण्णा निंबाळकर आणि अप्पासाहेब काळे यांचाही सत्कार करण्यात आला.

 स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या  कर्मयोगी कै अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या  चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा,  रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य  श्रीनिवास गोठे चित्रकला, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, प्रा. डॉ.दत्तकुमार म्हमाणे, प्रा. डॉ. राजकुमार मोहोरकर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक  मल्लिनाथ साखरे,सीटीओ तुकाराम साळुंखे  आदी उपस्थित होते.   कॅप्टन शिल्पा लब्बा यानी  सूत्रसंचालन केले.





























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा