बँक ऑफ इंडियाला संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भेट



सोलापूर प्रतिनिधी 

बँकेतील वाणिज्य विभागातील कामकाज  समजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तक मंडळाने  बँक व्हिजिट  हा एक उपक्रम  नेमलेला आहे.  या अंतर्गत संगमेश्वर कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेस भेट दिली आणि कामकाज समजावून घेतले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या  इयत्ता ११ वी १२ वी  बँकिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या  विद्यार्थ्यांची बँक ऑफ इंडिया रेल्वे लाईन शाखा सोलापूर येथे बँक व्हिजिट झाली. याप्रसंगी बँकेचे प्रमुख  व्यवस्थापक  निर्मल पात्रा यानी बँकेतील सर्व कामकाजाची माहिती यामध्ये (Saving A/c, Current A/c, Fixed Deposits, Recurring Deposits, RTGS, NEFT, Types of Loan A/c, Cheque,Locker Facilities ) याबाबत सविस्तर माहिती सांगितली.


 याप्रसंगी संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे समन्वयक  प्रा. बसय्या हणमगांव,

प्रा.बाबासाहेब सगर, प्रा.निनाद सपकाळ,प्रा. रुपाली पाटील, प्रा.संगीत म्हमाणे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र बिराजदार यांनी केले. आभार प्रदर्शन बँकिंग विषयाची विद्यार्थिनी कु.प्रज्ञा दनगे यांनी केले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा