वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. शुभांगी कुलकर्णी

  

हिंदी विभाग आयोजि वक्तृत्व स्पर्धेत सादिया शेख प्रथम

सोलापूर प्रतिनिधी 

  '' शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून आपण सतत वाचन केले पाहिजे या वाचनातून  मनाचे भरण -पोषण तर होतेच महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळत जातात. या संदर्भातून आपले बोलणे  सहज सोपे आणि प्रभावी होऊ शकते. त्यासाठी वाचा. वाचल्याशिवाय पर्याय नाही.  सूक्ष्म निरीक्षण शक्ती ही अत्यंत महत्त्वाच आहे. वाचनाला दिशा मिळाली की वक्ता होण्याचा मार्ग सुकर होतो. '' असे प्रतिपादन  शुभांगी कुलकर्णी यांनी केले. त्या  भाषा संकुलाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या  वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.  याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे , भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी आदी उपस्थित होते.


                      प्रारंभी सरस्वती पूजन झाले. सरस्वती पूजनानंतर प्रा. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक  करून  अतिथींचा परिचय करून दिला.  अतिथी मनोगता नंतर उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली भाषणे सादर केली.  निकाल याप्रमाणे -कु.सादिया शेख (प्रथम क्रमांक) कु.प्रज्ञा वाघमारे (द्वितीय ) कु.नर्गिस उस्ताद (तिसरा).  विजेत्यांचा संगमेश्वर कॉलेज वरिष्ठ हिंदी विभागप्रमुख डॉ.संघप्रकाश दुड्डे  यांच्या सह अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                     याप्रसंगी कला शाखा विभाग प्रमुख शिवशरण दुलंगे,संतोष पवार यांच्यासह हिंदी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. संजना पारे हिने सूत्रसंचालन केले तर अमृता शर्मा हिने सर्वांच्या आभार मानले.









         


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा