पोस्ट्स

विद्यार्थ्यांनी अनुभवले इन सोलापूर न्यूज चॅनलचे कामकाज

इमेज
 डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी शिकायला मिळते                                                     - राजेश कुलकर्णी  सोलापूर ( दिनांक २५ जुलै )  विविध वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांचे भाषेचे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि लेखनकौशल्य सुधारते.मराठी भाषेतील डिजिटल साधने जसे की शिक्षण अ‍ॅप्स, ऑडिओ-वाचन, व्हिडिओ शिकवण्या विद्यार्थ्यांना जड विषय सोप्या पद्धतीने शिकवतात. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना ही साधने शिक्षण अधिक समजण्याजोगे करतात.मराठी डिजिटल माध्यमांमध्ये अनेकदा लोककथा, बोधकथा, संत साहित्य, इत्यादींचा समावेश असतो, जे मुलांमध्ये नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजवतात. मराठी माध्यमातून शिकताना विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय अधिक चांगल्या प्रकारे होतो. पारंपरिक सण, कथा, इतिहास यांची माहिती डिजिटल माध्यमांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचते.डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी शिकायला मिळते. असे प्रतिपादन ...

शाहीर राम जोशी यांच्या आठवणींना उजाळा

इमेज
मराठी भाषा क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद  सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक २५ जुलै ) साहित्यिकांच्या वारसा स्थळांना भेट देणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर ती एक शिक्षणप्रक्रिया आहे. या स्थळांमधून विद्यार्थ्यांना साहित्याची जडणघडण, सांस्कृतिक समृद्धी, भाषेची सजीवता आणि माणूस म्हणून वाढ होण्याचा मार्ग मिळतो. अशा स्थळांची नियमित पाहणी ही शैक्षणिक उपक्रमाचा अविभाज्य भाग व्हावा, अशी गरज निर्माण झाली असल्याने.विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील सांस्कृतिक भांडाराची जाणीव करून दयावे  या उद्देशाने संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मराठी साहित्यातील कविराय राम जोशी यांच्या सोलापुरातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या विषयी माहिती घेण्यात आली. तो संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले.  प्रारंभी विद्यार्थ्यांना एकत्रित करून कविराय राम जोशी यांच्या विषयी माहिती देण्यात आली.त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी जाऊन माहिती घेण्यात आली याप्रसंगी अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.  सोलापुरातील कविराय रा...

जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ‘ मेक अँड ट्रेड ’ व पोस्टर सादरीकरण स्पर्धा

इमेज
सोलापूर प्रतिनिधी-  जागतिक चॉकलेट दिनानिमित्त संगमेश्वर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘मेक अँड ट्रेड’ आणि ‘पोस्टर प्रेसेंटेशन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य आणि सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘भकालो फ्रुट्स, सोलापूर’चे संचालक श्री. धीरेनबाई गडा यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत श्री. वर्धिनी संस्थेचे चन्नवीर बंकुर व पार्थ तेरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा, उपप्राचार्य डॉ. वी. के. पुरोहित, तसेच वाणिज्य मंडळ समन्वयक डॉ. आर. एम. खिलारे यांचा समावेश होता. यावेळी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  धीरेनबाई गडा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील उपक्रमांचे आणि चॉकलेट निर्मितीतील नवकल्पनांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले. ‘मेक अँड ट्रेड’ स्पर्धेसाठी 20 संघ सहभागी झाले, तर ‘पोस्टर प्रेसेंटेशन’साठी 30 संघ सहभागी झाले. एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मेक अँड ट्रेड’ मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः...

अमली पदार्थांचे दुष्परिणाम भयानक,तरुणांनो सावधगिरी बाळगा --- राजन माने

इमेज
संगमेश्वर कॉलेजच्या प्रबोधन कट्ट्याच्या वतीने जनजागृती  अमली पदार्थ विरोधी दिन - १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) हा दिवस जाहीर केला.यामागील उद्दिष्ट समजावूनघेतल्यावर लक्षात येते की,अमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे.बेकायदेशीर तस्करी थांबवणे.व्यसनमुक्त समाजाची जाणीव निर्माण करणे.या बाबी महत्वाच्या आहेत.त्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे  – कारण व्यसनाचे सर्वात जास्त प्रमाण तरुणांमध्ये आढळते.शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण व्हावे,गुन्हेगारी आणि समाज विघातक क्रियाकलापांपासून युवक लांब गेला पाहिजे . वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात सुधारणा व्हावी यासाठी प्रबोधन गरजेचे आहे. त्यासाठी भारतभर व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, शपथ विधी,व्यसनमुक्तीविषयी माहितीपट दाखवणे ,पुनर्वसन केंद्रांची मदत व माहिती देणे असे उपक्रम घेतला जातात. त्यांचाच एक भाग म्हणून  संगमेश्वर कॉलेज सोलापूर कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबवला जाणाऱ्या उपक्रमामध्येआज सोमवार २१  जुलै रोजी अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सात रस्ता परि...

संगमेश्वर कॉलेज एनसीसी कॅडेट्सची यशस्वी परंपरा कायम

इमेज
सोलापूर प्रतिनिधी  - महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर आयोजित सीएटीसी ७०३ व सीएसटीसी ७०४ असे दोन एनसीसी कॅम्प सहस्रार्जुन प्रशाला येथे घेण्यात आले होते. या कॅम्पमधील विविध स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामधील कॅम्पचे प्रतिनिधित्व इरफान तांबोळी, प्रियंका राठोड, दर्शन चिंचोळकर, सौंदर्या पुजारी यांनी केले.               या एनसीसी शिबिरामध्ये मुलांसाठी व्हॉलिबॉल, रस्सीखेच, खो-खो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये (हॉलिबॉल) संगमेश्वर कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सना प्रथम क्रमांक मिळाला, तर रस्सीखेच या स्पर्धेमध्ये मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच खो-खो या स्पर्धे त मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. वैयक्तिक प्रकारामध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत विवेक पानीभाते प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमधून अक्षता धर्मे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या कॅम्पमधून बेस्ट वॉलेंटियर कॅडेट म्हणून कल्याणी नागठाण या कॅडेटची निवड करण्यात आली. तसेच याच कॅम्पमधून पुढील थलसेना कॅ...

आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

इमेज
सोलापूर ( दिनांक २१ ) यंदाच्या २०२५ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य ' एक पृथ्वी, एक आरोग्य ' (One Earth, One Health) असे आहे. याचा अर्थ असा की, योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीला आणि लोकांना निरोगी बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे, असे PIB ने म्हटले आहे.  याला अनुसरून संगमेश्वर महाविद्यालय, रात्र विभाग आणि संगमेश्वर च्या विविध संस्थांच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकाचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. यंदाच्या योग दिन उत्साहात साजरा केला. याकरता कॉलेजच्या जिमखाना विभागाने नियोजन केलं होतं. प्रारंभी प्रा. शरण वांगी यांनी योददिनाचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी उपस्थित रीदमॅटिक योगाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. त्यानंतर योगाचा  प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुढच्या महिन्यापासून योगाच्या स्पर्धा शहर आणि परिसरात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग गुरु स्नेहल पेंडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यातून त्यांनी योग जीवनासाठी कसा आवश्यक आहे, हे अधोरेखित केले.त्यांनतर प्रात्यक्षिकास प्रारंभ...