जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ‘ मेक अँड ट्रेड ’ व पोस्टर सादरीकरण स्पर्धा


सोलापूर प्रतिनिधी- 

जागतिक चॉकलेट दिनानिमित्त संगमेश्वर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘मेक अँड ट्रेड’ आणि ‘पोस्टर प्रेसेंटेशन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य आणि सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘भकालो फ्रुट्स, सोलापूर’चे संचालक श्री. धीरेनबाई गडा यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत श्री. वर्धिनी संस्थेचे चन्नवीर बंकुर व पार्थ तेरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा, उपप्राचार्य डॉ. वी. के. पुरोहित, तसेच वाणिज्य मंडळ समन्वयक डॉ. आर. एम. खिलारे यांचा समावेश होता. यावेळी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


धीरेनबाई गडा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील उपक्रमांचे आणि चॉकलेट निर्मितीतील नवकल्पनांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले. ‘मेक अँड ट्रेड’ स्पर्धेसाठी 20 संघ सहभागी झाले, तर ‘पोस्टर प्रेसेंटेशन’साठी 30 संघ सहभागी झाले. एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मेक अँड ट्रेड’ मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या चॉकलेट वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली. काही विद्यार्थ्यांनी चॉकलेटमधील नावीन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला. ‘पोस्टर सादरीकरण’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चॉकलेटच्या आरोग्यदायी फायद्यांपासून ते सणांतील उपयोग, मिथकं व तथ्य यावर विचार मांडले. प्रा. डॉ. इंदुमती चोळ्ळे (एलबीपीएम महाविद्यालय), प्रा. डॉ. महानंदा बगले, प्रा. वनिता शिवशरण, प्रा. अनिता अलकुंटे (संगमेश्वर महाविद्यालय) यांनी स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पाहिले.


'मेक अँड ट्रेड' स्पर्धा विजेते:

1. प्रथम क्रमांक: बीबीए विभाग – कोमल बन्ने, समृद्धी मोरे, प्राची ओळेकर, श्रद्धा निर्मुंकरी

2. द्वितीय क्रमांक: बीकॉम विभाग – ऋतुराज घोडके, संदेश बिरादार, मयूर वाले, ओम अरमानी

3. तृतीय क्रमांक: बीए नागरी सेवा विभाग – सुभलक्ष्मी सुगरे, सुप्रिया सुगरे, आकांक्षा खटावकर, श्रुती भाईकट्टी


पोस्टर सादरीकरण स्पर्धा विजेते:

1. प्रथम क्रमांक: बनसिद्ध बरगंडे, सतीश लोखंडे

2. द्वितीय क्रमांक: मुस्कान शेख, श्रावणी तौर

3. तृतीय क्रमांक: मनोज कन्नीकर, रोहित खोकले


विजेत्या विद्यार्थ्यांना चॉकलेट गिफ्ट हॅम्पर आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण प्रा. डॉ. शुभांगी गावंडे यांच्या हस्ते पार पडले.  प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशा उपक्रमांचा सातत्याने अनुभव घ्यावा असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. वि. के. पुरोहित यांनी भविष्यातही व्यवहारिक ज्ञान वाढवणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी