अमली पदार्थांचे दुष्परिणाम भयानक,तरुणांनो सावधगिरी बाळगा --- राजन माने


संगमेश्वर कॉलेजच्या प्रबोधन कट्ट्याच्या वतीने जनजागृती 

अमली पदार्थ विरोधी दिन - १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) हा दिवस जाहीर केला.यामागील उद्दिष्ट समजावूनघेतल्यावर लक्षात येते की,अमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे.बेकायदेशीर तस्करी थांबवणे.व्यसनमुक्त समाजाची जाणीव निर्माण करणे.या बाबी महत्वाच्या आहेत.त्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे  – कारण व्यसनाचे सर्वात जास्त प्रमाण तरुणांमध्ये आढळते.शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण व्हावे,गुन्हेगारी आणि समाज विघातक क्रियाकलापांपासून युवक लांब गेला पाहिजे . वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात सुधारणा व्हावी यासाठी प्रबोधन गरजेचे आहे.

त्यासाठी भारतभर व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, शपथ विधी,व्यसनमुक्तीविषयी माहितीपट दाखवणे ,पुनर्वसन केंद्रांची मदत व माहिती देणे असे उपक्रम घेतला जातात. त्यांचाच एक भाग म्हणून  संगमेश्वर कॉलेज सोलापूर कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबवला जाणाऱ्या उपक्रमामध्येआज सोमवार २१  जुलै रोजी अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सात रस्ता परिसरामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक व सोलापूर शहर पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली या जनजागृती मोहीम मध्ये अमली पदार्थ विरोधी बॅनर्स पोस्टर घेऊन विद्यार्थ्यांच्या सहभागाने लोकांचे प्रबोधन करण्यात आले सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती कॉलेजचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे  यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील  प्रदीप आर्य आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम संपन्न झाली. 


अमली पदार्थांचे दुष्परिणाम भयानक आहेत.मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम (उदा. नैराश्य, आत्महत्येचा विचार) . शारीरिक आरोग्यावर परिणाम (उदा. यकृत, फुफ्फुस निकामी होणे) समाजात गुन्हेगारी वाढते,कुटुंबातील ताणतणाव व तुटलेली नातीयामुळे तरुणाचे जीव उध्वस्त होते. य्त्यामुळे प्रबोधन गरजेचे आहे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी केले.


🌱 संदेश:

नशा नाही, दिशा हवी – 

आरोग्यदायी जीवनासाठी व्यसनमुक्ती अनिवार्य आहे.

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी