पोस्ट्स

' आधुनिक अवकाश नेत्र ' या विषयावर सारंग ओक यांचे व्याख्यान

इमेज
 कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेचा उपक्रम सॊलापूर ( दिनांक ७ सप्टेंबर ) आकाशातील चंद्र तारे सूर्यग्रहण किती आहेत याचा अभ्यास करू शकतो का ? एकच तारा दिसतो बाकीचे तारे का दिसत नाहीत ? ताऱ्यांची संख्या मोजू शकता का ? पृथ्वीवर सजीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली ? अशा अवकाशाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे  सारंग ओक यांनी दिली. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित ' आधुनिक अवकाश नेत्र  ' या कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य  प्रसाद कुंटे  उपस्थित होते.  प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्यांनी या अभिनव उपक्रमाविषयी कौतुक करत संवाद साधला.               हब्बल स्पेस टेलिस्कोप 38 वर्षांपूर्वी अवकाशात पाठवला गेला तो आजही कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वी  महिन्यापूर्वी जेम्स वेब  स्पेस टेलिस्कोप सोडला गेला. चंद्रयान ३ मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. चंद्रावरती पाणी आणि तेथील सजीवसृष्टीचा अभ्यास सुरूय.मानवी वास्तव्य होऊ...

इंग्रजीप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे - डॉ.सतीश लकडे

इमेज
  संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी - 'सॉफ्ट स्किल्स सेल्फ मोटिवेशन' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले जीवनात प्रगती साधायची असेल तर इंग्रजी भाषेतील प्रभुत्व ज्याप्रमाणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे.''असे प्रतिपादन डॉ.सतीश लकडे  ( एच.आर.,एन्जिग्मा सॉफ्टवेअर, पुणे ) यांनी केले.ते संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी हे होते. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.उषा जमादार यांनी केले.प्रा.डॉ. रेश्मा जावळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नंदा साठे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रा.डॉ. सुहास पुजारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा.डॉ. सतीश लकडे यांनी  सॉफ्ट स्किल्सची व्याख्या करून त्यांनी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स यामधील फरक स्पष्ट केला तसेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या आधारे मनोरंजक ...

बँकिंग मधील आर्थिक साक्षरतेची गरज - हनुमंत भालेराव

इमेज
   संगमेश्वर कॉलेज वाणिज्य शाखेचा उपक्रम   ''बँकेच्या नावाखाली येणारे फ्रॉड कॉल,,मेसेजेस यापासून आपण सावध राहिले पाहिजे.  बँकेकडून अधिकृत अँपची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते या सेवेच्या संदर्भात आपण जागरूक राहिलो तर आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. वाढत्या ऑनलाइन घोटाळ्याच्या या जमान्यात त् बँकिंगमधील आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनत चालली आहे '' असे प्रतिपादन  जिल्हा अग्रणी बँक व वित्तीय समावेशन विभाग सोलापूर आंचलित कार्यालयातर्फे आर्थिक साक्षरता शिबिर अंतर्गत आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक   हनुमंत भालेराव यांनी केले. संगमेश्वर महाविद्यालय कनिष्ठ विभाग  वाणिज्य शाखा यांच्या वतीने 'माझं करिअर' या उपक्रमामधील  'बँकिंग मधील आर्थिक साक्षरता' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,  वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.बसय्या हणमगाव आदी मान्यवर उपस्थित होते.    प्रारंभी प्रा.बसय्या हणमगाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांनी  विद्यार्थ्यां...

शिक्षकदिन उत्साहात

इमेज
संगमेश्वरमध्ये विद्यार्थ्यांकडून 'कृतज्ञता सोहळा'   सोलापूर ( दिनांक 5 सप्टेंबर ) भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ, भारतरत्न, शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत वर्षात  शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे   पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, ज्येष्ठ शिक्षक तानाजी घाडगे उपस्थित होते .                       प्रारंभी स्वरदा मोहोळकर, वैष्णवी घाडगे यांनी स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्याचे प्रास्ताविक जान्हवी परदेशी हिने केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.  सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घे...

संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक

इमेज
 क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने केले सन्मानित --पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील पूर्व व्यवस्थान सदस्य श्री. अमित कुलकर्णी,   प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोटे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण, डॉ. शिवाजी मस्के, श्री. वैजू स्वामी आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेजला उज्जवलशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश...

काकांनी उदार दृष्टिकोनातून संस्थात्मक कार्य केले. - प्रा. डॉ. सुहास पुजारी

इमेज
    कै. मेघराज काडादी स्मृतिदिन सोलापूर ( दिनांक 2 सप्टेंबर )  '' आदरणीय मेघराज काकांनी संस्थात्मक पातळीवर काम करताना साधी राहणी  व उच्च विचारसरणीचा अवलंब करून निर्मोही वृत्तीने काम केले. ते उच्च विभाग विद्याविभूषित होते .आप्पांच्या गांधीवादी विचारसारणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपुलकीने ते सगळ्यांना आपलेसे करून घेत. निस्पृह वृत्तीने आणि उदार दृष्टीकोनातून त्यांनी संस्थात्मक कार्य उभे केले.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले. ते संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष कै. मेघराज काडादींच्या स्मृतीदिन प्रसंगी अभिवादन कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते.  व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई उपस्थित होते.  प्रारंभी पुष्पहार अर्पण करून  शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.  प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी  शैक्षणिक कार्य करताना कॉलेजच्या कामकाजा संदर्भात त्यांनी केलेले मार्गदर्शन या संदर्भात आठवणींना उजाळा दिला . सूत्रसंचालन प्रा.डॉ.संतोष मेटकरी य...

कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते. - डॉ. राजेंद्र देसाई

इमेज
 राष्ट्रीय क्रीडा दिन संगमेश्वर मध्ये उत्साहात सोलापूर ( दि. २९  ) ''आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून राहणे  महत्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी,  व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. ते  केवळ  खेळांमुळे  शक्य आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते.असे प्रतिपादन डॉ.  राजेंद्र देसाई यांनी केले.  ते  ष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने  संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या  क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.   याप्रसंगी व्यासपीठावर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे,  संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रियांका समुद्रे शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण  आदी  उपस्थित होते.   विविध क्रीडा स्पर्धा मैदानावर संपन्न झाल्या.  निकाल  - अंतिम निकाल 14 वर्षाखालील संगमेश्वर पब्लिक स्कूल  सूर्यनमस्कार प्रथम मयूर यादव  द्विती...