बँकिंग मधील आर्थिक साक्षरतेची गरज - हनुमंत भालेराव

 

 संगमेश्वर कॉलेज वाणिज्य शाखेचा उपक्रम 

 ''बँकेच्या नावाखाली येणारे फ्रॉड कॉल,,मेसेजेस यापासून आपण सावध राहिले पाहिजे.  बँकेकडून अधिकृत अँपची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते या सेवेच्या संदर्भात आपण जागरूक राहिलो तर आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. वाढत्या ऑनलाइन घोटाळ्याच्या या जमान्यात त् बँकिंगमधील आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनत चालली आहे '' असे प्रतिपादन  जिल्हा अग्रणी बँक व वित्तीय समावेशन विभाग सोलापूर आंचलित कार्यालयातर्फे आर्थिक साक्षरता शिबिर अंतर्गत आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक  हनुमंत भालेराव यांनी केले. संगमेश्वर महाविद्यालय कनिष्ठ विभाग  वाणिज्य शाखा यांच्या वतीने 'माझं करिअर' या उपक्रमामधील  'बँकिंग मधील आर्थिक साक्षरता' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,  वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.बसय्या हणमगाव आदी मान्यवर उपस्थित होते. 


 

प्रारंभी प्रा.बसय्या हणमगाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांनी  विद्यार्थ्यांना  संबोधित केले.प्रा. निनाद सपकाळ, प्रा.  पी.पी. अवधानी,प्रा. आर. एस. मळेवाडी,प्रा.रवींद्र बिराजदार,प्रा.गौरव जुगदार, प्रा.रूपाली पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संगीता म्हमाणे यांनी केले तर आभार प्रा.बाबासाहेब सगर यांनी मानले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा