संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक

 क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने केले सन्मानित


--पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला सलग पाचव्यांदा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील पूर्व व्यवस्थान सदस्य श्री. अमित कुलकर्णी,   प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोटे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण, डॉ. शिवाजी मस्के, श्री. वैजू स्वामी आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेजला उज्जवलशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणारे खेळाडू कॉलेजमधून घडलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधीची उपलब्ध्दता निर्माण करून दिली जाते. कॉलेजच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव धर्मराज काडादी, व्यवस्थापन सदस्या प्रा. ज्योती काडादी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा