शिक्षकदिन उत्साहात


संगमेश्वरमध्ये विद्यार्थ्यांकडून 'कृतज्ञता सोहळा'  

सोलापूर ( दिनांक 5 सप्टेंबर ) भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ, भारतरत्न, शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत वर्षात  शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे   पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, ज्येष्ठ शिक्षक तानाजी घाडगे उपस्थित होते . 



                     प्रारंभी स्वरदा मोहोळकर, वैष्णवी घाडगे यांनी स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्याचे प्रास्ताविक जान्हवी परदेशी हिने केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.  सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेत आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये श्रेयसी कुंटे,आरती ओव्हाळ, राजश्री गाडेकर, प्रतिमा टोणपे,  सृष्टी खरात यांनी मराठीतून  आपलं मनोगत व्यक्त केलं. तर ऋग्वेद देशमुख (संस्कृत) अवनी अहुजा (हिंदी)  सुमित्रा म्हेत्रे (कन्नड)   उत्तमा ढगे  ( इंग्रजी ) यांनी  त्यांच्या आवडीच्या भाषेतून  उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांच्या मनोगतात  तानाजी घाडगे,  दत्तात्रय गुड्डेवाडी,  पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य यांनी  विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याचे कौतुक केले आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन समीक्षा डोके आणि राधिका देशपांडे यांनी केले तर  श्रुती खरात हिने सर्वांचे आभार मानले.






























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा