इंग्रजीप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे - डॉ.सतीश लकडे

 

संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

सोलापूर प्रतिनिधी - 'सॉफ्ट स्किल्स सेल्फ मोटिवेशन' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले जीवनात प्रगती साधायची असेल तर इंग्रजी भाषेतील प्रभुत्व ज्याप्रमाणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे.''असे प्रतिपादन डॉ.सतीश लकडे  ( एच.आर.,एन्जिग्मा सॉफ्टवेअर, पुणे ) यांनी केले.ते संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी हे होते.




सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.उषा जमादार यांनी केले.प्रा.डॉ. रेश्मा जावळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नंदा साठे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रा.डॉ. सुहास पुजारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा.डॉ. सतीश लकडे यांनी  सॉफ्ट स्किल्सची व्याख्या करून त्यांनी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स यामधील फरक स्पष्ट केला तसेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या आधारे मनोरंजक व सोप्या पद्धतीने सेल्फ मोटिवेशन कसे करायचे हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले. 

इंग्रजी विषयात सेट नेट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार याच कार्यक्रमात करण्यात आला.याप्रसंगी प्रा.डॉ. मकानदार, प्रा.डॉ.रेश्मा शेख आणि प्रा. संतोष पवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा.रेवण हालोळी यांनी सूत्रसंचालन केले तर  प्रा. चिकटे यांनी सर्वांचे आभार मानले.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा