काकांनी उदार दृष्टिकोनातून संस्थात्मक कार्य केले. - प्रा. डॉ. सुहास पुजारी
कै. मेघराज काडादी स्मृतिदिन
सोलापूर ( दिनांक 2 सप्टेंबर ) '' आदरणीय मेघराज काकांनी संस्थात्मक पातळीवर काम करताना साधी राहणी व उच्च विचारसरणीचा अवलंब करून निर्मोही वृत्तीने काम केले. ते उच्च विभाग विद्याविभूषित होते .आप्पांच्या गांधीवादी विचारसारणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपुलकीने ते सगळ्यांना आपलेसे करून घेत. निस्पृह वृत्तीने आणि उदार दृष्टीकोनातून त्यांनी संस्थात्मक कार्य उभे केले.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले. ते संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष कै. मेघराज काडादींच्या स्मृतीदिन प्रसंगी अभिवादन कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई उपस्थित होते.
प्रारंभी पुष्पहार अर्पण करून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी शैक्षणिक कार्य करताना कॉलेजच्या कामकाजा संदर्भात त्यांनी केलेले मार्गदर्शन या संदर्भात आठवणींना उजाळा दिला . सूत्रसंचालन प्रा.डॉ.संतोष मेटकरी यांनी केले तर आभार ग्रंथपाल विजयकुमार मुलीमनी यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा