' आधुनिक अवकाश नेत्र ' या विषयावर सारंग ओक यांचे व्याख्यान


 कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेचा उपक्रम

सॊलापूर ( दिनांक ७ सप्टेंबर )

आकाशातील चंद्र तारे सूर्यग्रहण किती आहेत याचा अभ्यास करू शकतो का ? एकच तारा दिसतो बाकीचे तारे का दिसत नाहीत ? ताऱ्यांची संख्या मोजू शकता का ? पृथ्वीवर सजीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली ? अशा अवकाशाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे  सारंग ओक यांनी दिली. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित ' आधुनिक अवकाश नेत्र  ' या कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य  प्रसाद कुंटे  उपस्थित होते.  प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्यांनी या अभिनव उपक्रमाविषयी कौतुक करत संवाद साधला.


              हब्बल स्पेस टेलिस्कोप 38 वर्षांपूर्वी अवकाशात पाठवला गेला तो आजही कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वी  महिन्यापूर्वी जेम्स वेब  स्पेस टेलिस्कोप सोडला गेला. चंद्रयान ३ मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. चंद्रावरती पाणी आणि तेथील सजीवसृष्टीचा अभ्यास सुरूय.मानवी वास्तव्य होऊ शकेल का ? याचा अभ्यास सध्या लँडरच्या मदतीने सुरू आहे.असेही त्यांनी सांगितले. 

                                 प्रारंभी माता सरस्वती आणि  कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण  करून, दीपप्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.     प्रमुख पाहुण्यांचा परिचय लीना खमितकर यांनी करून दिला. त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते झाला.प्रमुख पाहुण्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. याप्रसंगी विज्ञान विभाग समन्वयक प्रा.रामभाऊ राठोड, प्रा.बाळकृष्ण कापसे, प्रा.विशाल जत्ती, प्रा.सुभाष पाटील,प्रा.प्रशांत पाटील,प्रा.संतोष पवार प्रा.अभिजीत निवर्गीकर, प्रा. एस. आर. पाटील,प्रा.नागेश कोल्हे, स्मिता शिंदे, प्रा.शंकर शितल,प्रा.संगमेश स्वामी,प्रा.रूपाली आंबुलगे उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.प्रियंका पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्राजक्ता चव्हाण यांनी मानले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा