संगमेश्वरध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

उज्वल क्रीडा परंपरेत जिद्दीने खेळा - प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक 29 ऑगस्ट ) '' क्रीडांगण ही केवळ एक खेळाची साधना नाही, तर ती जीवनाचा धडा शिकवणारी शाळा आहे. खेळताना आपण शिस्त, संघभावना, संयम, परिश्रम आणि आत्मविश्वास या जीवनमूल्यांचा अनुभव घेतो. आपल्या महाविद्यालयाची उज्वल क्रीडा परंपरा अनेक खेळाडूंच्या मेहनतीवर उभी आहे.ऑलम्पिकमधल्या पी. टी. उषा सोबत धावणारी वंदना शानबाग आपल्या कॉलेजच्या. गोपी मलपेद्दी, सुदेश मालप, अनघा देशपांडे, खेलो इंडिया श्रुतिका चव्हाण, ईशान मेरू यांच्या पर्यंतचा हा प्रवास दैदिप्यमान आहे. त्यांनी मिळवलेली यशस्वी कामगिरी ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.खरा खेळाडू तोच, जो विजय मिळाल्यावर अहंकार न करता नम्र राहतो आणि पराभव झाल्यावर खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा उभा राहतो. विजय-पराजय हे खेळाचा अविभाज्य भाग आहेत; पण जिद्दीने खेळलेला खेळच खरी ओळख ठरतो. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त, ज्युनिअर कॉलेज,नाईट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्...