कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंतीनिमित्त उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


                      कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११६ व्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त  वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन प्रतिवर्षे प्रमाणे यंदा १५ सप्टेंबरला करण्यात आले आहे.संगमेश्वर कॉलेज,स्वायत्त ,दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी अप्पासाहेब  नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा कॉलेजमध्ये बी वन,सभागृहात होणार आहे.

                                            ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना खुली असून  प्रत्येक महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील दोन व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेत पाठवता येतील.प्रत्येक स्पर्धकास  विषयचिठ्ठी उचलून ऐन वेळेस मिळालेल्या विषयावर आपले वक्तृत्व सादर करावयाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास पाच मिनिटे बोलण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकास पाच मिनिटे वक्तृत्व पूर्वी विचार करण्यास वेळ मिळणार आहे.शनिवार,दिनांक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम नाव नोंदणी करता येईल.त्यासाठी गुगल फॉर्मचा क्यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे..


                                                          या स्पर्धेतील पारितोषिके याप्रमाणे - प्रथम क्रमांक - ५००१ रुपये , द्वितीय क्रमांक – ३००१ रुपये ,तृतीय क्रमांक – २००१ रुपये ,उत्तेजनार्थ एक प्रशस्तिपत्रक.  महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक - कर्मयोगी अप्पासाहेब काडादी  आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा समिती, प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर,उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी  समन्वयक प्रा.डॉ.सुहास दहिटणेकर- 98505 45940 यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी  प्रा. राजकुमार खिलारे 94205 46695 यांच्याशी संपर्क साधावा.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के