बीबीए बीसीए प्रवेशाची पहिली कॅप राऊंड सुरू
ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी संगमेश्वरमध्ये सुविधा व मार्गदर्शन
सोलापूर प्रतिनिधी-
बीबीए बीसीए प्रवेशासाठीची CET (प्रारंभिक परीक्षा) २९व ३० एप्रिल २०२५ झाली.त्यांनतर दुसरी परीक्षा १९ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. एप्रिल मध्ये ज्यांची परीक्षा चुकली होती त्यांना जुलैमध्ये संधी देण्यात आली. या दोन्ही परीक्षातील सर्वोच्च गुणच ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रतीक्षेनंतर अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) २८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांची नावे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना कॉलेज निवडीसाठी २९ ऑगस्ट रोजी पहिले कॅप राऊंड सुरू होणार आहे.
१९५३ पासून उच्च शिक्षणात अग्रेसर असलेल्या संगमेश्वर शिक्षण संस्थेमध्ये व्यवस्थापन व संगणक शास्त्र विभागात तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद असून उज्वल निकालाची परंपरा, प्लेसमेंटच्या माध्यमातून उत्तम नोकरीच्या संधी देणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयाला भेट द्यावी. संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 16150 हा कॉलेज कोड आहे.. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना संगमेश्वर कॉलेजमध्ये सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवेश प्रक्रिया विभागप्रमुख प्रा.बमनिंग बुक्का ( 95 033 37 227 ) यांनी केले आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा