संगमेश्वरचे डॉ.आनंद चव्हाण, संतोष खेंडे, प्रा.शरणबसवेश्वर वांगी सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

 सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा'



सोलापूर प्रतिनिधी --

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षापासून क्रीडा, शारीरिक शिक्षण, खेळ व व्यायाम या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत केली. उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक पुरस्काराचे मानकरी संगमेश्वर कॉलेजमधील डॉ. आनंद बाळासाहेब चव्हाण हे ठरले आहेत.

उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर जुनिअर कॉलेजचे संतोष धर्मा खेडे यांना प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार जलतरण व डायव्हिंगमपील श्रीकांत गंगाधर शेटे व हँडबॉलमधील शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे तर अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार बापूराव संगवे यांना जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. 

मानपत्र, सन्मानचिन्ह, अहिल्यादेवींची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून समितीने पुरस्कर्त्यांची निवड केली आहे.या कार्यक्रमास खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, प्रा. डॉ. अंबादास भास्के, शिवानंद मैलारी आदी उपस्थित होते.

उद्या २९ऑगस्टला  पुरस्कार वितरण सोहळा

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वा पुरस्काराचे वितरण शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होईल. याच कार्यक्रमात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यापीठातील ज्या खेळाडूंनी ऑल इंडिया, साऊथ वेस्ट झोन आणि क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंचा रोख रकम व पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. याचबरोबर क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचा देखील यावेळी सन्मान होईल.

संगमेश्वर कॉलेजचे डॉ. आनंद चव्हाण,  कनिष्ठ महाविद्यालयाचे संतोष खंडे, रात्र महाविद्यालयाचे शरणबसवेश्वर वांगी हेही अनुक्रमे शारीरीक शिक्षण संचालक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशनतर्फे सोलापुरातील विविध शाळा व कॉलेजमधील क्रीडा शिक्षक, प्राध्यापक आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.प्रा. विक्रांत विभुते (शारीरिक शिक्षण संचालक. संगमेश्वर कॉलेज महाविद्यालय) यांचा यात समावेशआहे.'









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के