संगमेश्वरध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

 उज्वल क्रीडा परंपरेत जिद्दीने खेळा

                        -  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा


सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक 29 ऑगस्ट ) '' क्रीडांगण  ही केवळ एक खेळाची साधना नाही, तर ती जीवनाचा धडा शिकवणारी शाळा आहे. खेळताना आपण शिस्त, संघभावना, संयम, परिश्रम आणि आत्मविश्वास या जीवनमूल्यांचा अनुभव घेतो. आपल्या महाविद्यालयाची उज्वल क्रीडा परंपरा अनेक खेळाडूंच्या मेहनतीवर उभी आहे.ऑलम्पिकमधल्या पी. टी. उषा सोबत धावणारी वंदना शानबाग आपल्या कॉलेजच्या. गोपी मलपेद्दी, सुदेश मालप, अनघा देशपांडे, खेलो इंडिया श्रुतिका चव्हाण, ईशान मेरू यांच्या पर्यंतचा हा प्रवास दैदिप्यमान आहे. त्यांनी मिळवलेली यशस्वी कामगिरी ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.खरा खेळाडू तोच, जो विजय मिळाल्यावर अहंकार न करता नम्र राहतो आणि पराभव झाल्यावर खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा उभा राहतो. विजय-पराजय हे खेळाचा अविभाज्य भाग आहेत; पण जिद्दीने खेळलेला खेळच खरी ओळख ठरतो. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त, ज्युनिअर कॉलेज,नाईट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा बोलत होते.ज्युनिअर कॉलेजचे उपाचार्य प्रा.प्रसाद कुंटे, जिमखाना चेअरमन डॉ. आनंद चव्हाण, प्रा.संतोष खेंडे  यांची उपस्थिती होती.

प्रारंभी शरण जिमखाना चेअरमन डॉ. आनंद चव्हाण  यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, मेघराज (काका) काडादी  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 डॉ.बुवा पुढे म्हणाले की,''  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला सलग सहाव्यांदा डॉ. पुरणचंद पुंजाल फिरता चषक जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने सर्वांचेअभिनंदन.आज आपण सर्वांनी कॉलेजच्या या उज्ज्वल परंपरेला पुढे नेण्याचे ठरवले पाहिजे. केवळ पदके किंवा ट्रॉफी जिंकणे एवढेच ध्येय नसून, खेळातून मिळणारी मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती आणि मैत्रीभाव हेही तितकेच मौल्यवान आहेत ''  या प्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे उपाचार्य प्रा.प्रसाद कुंटे  यांनीही  उपस्थित सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  ते पुढे म्हणाले की,'' आपल्या कॉलेजमधील जिमखाना विभागातील शारीरिक शिक्षण संचालक यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालय आणि रात्र महाविद्यालयाच्या चारही मान्यवर प्राध्यापकांना विद्यापीठ स्तरावरील आणि सामाजिक स्तरावरील संस्थांकडून पुरस्कार जाहीर झालेत. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेष म्हणजे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपचा पुरस्कार सलग ६व्यांदा आपल्याच कॉलेजला मिळालेला आहे.  म्हणून आजचा दिवस सोनियाचा आहे.''

              या प्रसंगी जिमखाना विभागातील शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच प्रा.संतोष पवार आणि  क्रीडा विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. रात्र महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.विक्रांत विभुते याने सर्वांचे आभार मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य  प्रसाद कुंटे ,शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी व खेळाडूं













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के