राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांना व्यापक संधी - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर


संगमेश्वरचा 69 आणि 70 वा वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ

 

सोलापूर, दि. 28 जानेवारी :  

आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत, पारंपरिक शिक्षण पद्धतीला बदलून कौशल्यावर आधारित नव्या शैक्षणिक संधी शोधल्या जात आहेत. यातून विद्यार्थ्यांचा व्यापक विकास होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये यासाठी विशेष प्रयोजन केलेले आहे. या धोरणाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे. विशेषत: विद्यार्थ्यांना यातून व्यापक संधी उपलब्ध होतील.  असे विचार महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र  देवळाणकर यांनी व्यक्त केले.


 संगमेश्वर कॉलेजमध्ये 69 आणि 70 व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणूनबोलताना मा. डॉ. शैलेंद्र  देवळाणकर

संगमेश्वर कॉलेजमध्ये 69 आणि 70 व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. ईरेश स्वामी, संस्थेचे सचिव मा. धर्मराज काडादी, मा. सौ. उमा काडादी, सौ. रेणुका देवळाणकर, राशी देवळाणकर, व्यवस्थापन सदस्य मा. शरणराज काडादी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. उमेश काकडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, कै. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिपक पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस मालप आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. सिद्देश्वर देवस्थान समितीचे सदस्य मा. आर.एस. पाटील, माजी प्राचार्य. नरेश बदनोरे, डॉ.एन.बी. तेली, डॉ. श्रीकांत येळेगांवकर, आणि डॉ. प्रमोद दर्गोपाटील इत्यांदींची विशेष उपस्थिती होती.

डॉ. शैलेंद्र  देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम श्री. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या मागील 70 वर्षातील कार्याचा गौरव केला. विशेषत: शिक्षणाची चळवळ तळागळापर्यंत पोहचवली याचे कौतुक केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून होणार्‍या शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती दिली. येणारा काळ धोरणाच्या अंमलबजावणीचा असून त्यामध्ये क्रांतिकारक बदल होणार आहेत. विशेषत: त्यामधून कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे. भारतातील सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम, श्रेणी पद्धती समानपातळी आणली जाणार आहे. विद्यार्थ्यांना  त्यामधून व्यापक शैक्षणिक संधी मिळणार असून यासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे असे विचार त्यांनी मांडले. 

या कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर गीताने व कु. वैशाली आगलावे, कु. वैष्णवी व्हनकवडे यांच्या ईशस्तवनाने झाली. पाहुण्यांचा परिचय प्रा. अनिता अलकुंटे यांनी करुन दिला. वरिष्ठ महाविद्यालय अहवाल वाचन प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी तर संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे यांनी केले. शैक्षणिक गुणवत्ता यादीचे वाचन कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, वरिष्ठ विभाग डॉ. व्ही. एन. मुलीमनी, रात्र महाविद्यालय सौ. आर. एस. बिराजदार यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस मालप याने मानले. सूत्रसंचालन डॉ. आरती दिवटे, डॉ. पुष्पांजली मेत्री व प्रा.संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी मोठया संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 





 

( फोटो ओळ - बोलताना मा. डॉ. शैलेंद्र  देवळाणकर, मंचावर मा. ईरेश स्वामी, मा. धर्मराज काडादी, उमा काडादी, डॉ. उमेश काकडे,   प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, प्राचार्य श्री. दिपक पाटील, श्रेयस मालप )











 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा