मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

संगमेश्वरध्ये हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आणि प्रबोधनपर व्याख्यान सोलापूर दिनांक २४ - हिमोग्लोबिन तपासणी हे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल असल्याने विद्यार्थ्यांनी ही तपासणी वेळीच करून घ्यावी आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे या उद्देशाने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रबोधनपर व्याख्यानात तज्ञांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी का गरजेची याविषयी डॉ.वीणा माने स्त्रीरोगतज्ञ म्हणाल्या की "हिमोग्लोबिन ही शरीरातील ऑक्सिजन वाहून नेणारी महत्त्वाची प्रथिनीय घटक आहे. मुलींमध्ये मासिक पाळीमुळे रक्तस्राव होतो, तसेच चुकीच्या आहाराच्या सवयी, जंक फूडचे वाढते प्रमाण आणि पोषणातील असमतोल यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या अवस्थेला ॲनिमिया म्हणतात. ॲनिमियामुळे थकवा, अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रतेत अडथळे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे व दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवतात." डॉ. प्रियांका भराडे व...