पोस्ट्स

सप्टेंबर १५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगीअप्पासाहेब काडादी जयंती I राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सातारचा माने प्रथम

इमेज
  सोलापूर (दिनांक १५) दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितकर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११६ व्या जयंती प्रीत्यर्थ महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उनाड पाऊस, शिक्षण याचे नाव,अध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील आपले विषय  वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर प्रशालेचे प्राचार्य संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे संतोष पाटील यावेळी बोलताना म्हणाले की,''  अप्पासाहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत दूरदृष्टीचे बहुआयामी होते. सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण  करत असताना  निष्पृह वृत्तीने त्यांनी  काम केले. काळाची पावले ओळखून कर्मयोगी अप्पासाहेबांनी सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही बाब ओळखली...