युवा महोत्सवात उपविजेत्या कलाकारांचा कौतुक सोहळा

सोलापूर प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या युवा महोत्सवात उपविजेत्या ठरलेल्या संगमेश्वर कॉलेजच्या कलाकारांचा कॉलेजच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी विजेत्या सर्व संघाचे कौतुक केले आणि त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना सचिव ज्योती काडादी यांनी कलाकारांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले. भविष्यातही असेच अथक परिश्रम करून आपण आपला संघ पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. संगमेश्वर कॉलेजची क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक परंपराही खूप मोठी आहे. तो वारसा जपण्याचे कर्तव्य कलाकारांनी निभावले आहे.असा मनोदय व्यक्त केला. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात प्रारंभी प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.दादासाहेब खांडेकर यांनी सविस्तर वृत्तांत सांगितला. त्यानंतर कलाकारांचा सत्कार झाला. सत्कार नंतर गोल्डन गर्ल पुरस्कार विजेती सई दरेकर आणि गतवर्षीच्या गोल्डन बॉय पुरस्कार विजेता जैद शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या....