संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड
विवेक पाणीभातेचा कॉलेज व ९ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सत्कार
सोलापूर प्रतिनिधी – दिनांक २४ सप्टेंबर – ९महाराष्ट्र बटालियन एनसीसी संलग्नित असलेले संगमेश्वर कॉलेजचा एनसीसी कॅडेट विवेक पाणीभातेची नवी दिल्ली येथे राष्ट्रीय थल सेना कॅम्प नवी दिल्ली येथे निवड झाली होती. महाराष्ट्रातून जवळपास १० एनसीसी कॅम्प मधून अतिशय खडतर प्रक्रियेतून एनसीसी कॅडेटची निवड होत असते. विवेक हा २० मे ते १५ सप्टेंबर पर्यंत जवळपास चार महिने तो एनसीसीच्या कॅम्पमध्ये सहभागी होता.
नवी दिल्ली येथे झालेल्या थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्राकडून १० एनसीसी कॅडेटची फायरिंग या प्रकारामध्ये निवड करण्यात आली होती त्यामध्ये विवेक पाणीभातेची निवड झाली होती. त्यामध्ये विवेक पाणीभाते याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. भारतामधील एकूण १७ एनसीसी संचालनालयापैकी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये विवेक पाणीभातेचे मोलाचे योगदान होते.राष्ट्रीय थल सेना कॅम्प, नवी दिल्ली या कॅम्पमध्ये निवड होणे ही एनसीसी मधील अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
त्याच्या या यशाबद्दल संगमेश्वर कॉलेज आणि नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियन च्या वतीने कॉलेजच्या आवारात सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश कुमार, लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर, सुभेदार मेजर कृष्णा सपकोटा ,विवेकची आई सौ.नंदा,वडील परशुराम पाणीभाते, संगमेश्वर कॉलेजचे शैक्षणिक सल्लागार डॉ.प्रमोद दर्गो पाटील,प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा आदि उपस्थित होते.
“आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय थलसेना कॅम्प मध्ये फायरिंग या प्रकारामध्ये मध्ये निवड होते ते विवेक ने करून दाखवले आहे.”असे मत रणधीर सतीश कुमार यावेळी बोलताना यांनी व्यक्त केले.त्यानंतर विवेक पाणीभाते याने त्याचे मनोगत व्यक्त केले.तो म्हणाला “आई-वडिलांचा आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन एनसीसी बटालियन ने निर्माण केलेला माझ्यातला आत्मविश्वास या जोरावर मी हे सगळं करू शकलो. कॉलेजनेही वेळोवेळी प्रोत्साहन दिले.” विवेकच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देऊन संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले, “संगमेश्वर कॉलेजचे 9 महाराष्ट्र बटालियनचे सर्वात मोठे युनिट म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या कॉलेजमधून राष्ट्रीय स्तरावर मुलं सहभागी होत असतात. ही कॉलेजची परंपरा आहे, ती परंपरा कायम राखत विवेकने यश मिळवले. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.या वेळी एनसीसी विभागाचे सर्व कर्मचारी, कॅप्टन शिल्पा लब्बा, लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, कॉलेजचे सर्व विभागचे उपप्राचार्य,विभागप्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे यांच्यासह एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर एनसीसी कॅडेट्सने एकच जल्लोष करत विवेकला त्याच्या पुढच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा