डॉ.ए.पी.जे.कलाम जन्मदिन - वाचन प्रेरणा दिन उत्साहात

पुस्तकांमुळे मनुष्य जीवन घडते - प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर सोलापूर दिनांक १५ ''मनुष्याचे जीवन हे सतत शिकण्याच्या प्रवृत्तीने विकसित होत असते. या जीवन प्रवासात पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे भांडार नाही, तर ते विचारांना दिशा देणारे, मनाला प्रेरणा देणारे आणि आयुष्य घडवणारी साधने आहेत.पुस्तकांमुळे मनुष्याचे जीवन घडते.'' असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी आयोजित 'वाचन प्रेरणा दिना'च्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, ग्रंथपाल डॉ. विजय मुलीमनी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.विजय मुलीमनी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी वाच...