‘हिंदी दिवस’ निबंध स्पर्धेत आयेशा नासिर सय्यद प्रथम

सोलापूर- दिनांक १४ प्रतिनिधी भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असा देश आहे. येथे प्रत्येक राज्याची आपली एक स्वतंत्र भाषा आहे. तथापि, राष्ट्राला एकत्र आणणारी आणि संवादाची सुलभ साधने निर्माण करणारी भाषा म्हणून हिंदीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी दिवसानिमित्त संगमेश्वर कॉलेज हिंदी कनिष्ठ विभाग आयोजित निबंध स्पर्धेमध्ये आयेशा नासिर सय्यद हिने प्रथम यरण्याचा मन मिळवला. पुढील निकाल याप्रमाणे --- सायली दीपक शिरसाठ -द्वितीय, प्रज्ञा दिनकर वाघमारे- तृतीय ,मनोरमा सुरज कांबळे - उत्तेजनार्थ, किरण इस्माईल नदाफ- उत्तेजनार्थ, सादिया हाजीमलंग शेख - उत्तेजनार्थ.परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संघप्रकाश दुड्डे यांनी सहकार्य केले. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी प्रा. शिवराज पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्...