' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा संदेश लक्षात घ्या - डॉ.प्रियांका भराडे

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम सोलापूर प्रतिनिधी --- आरोग्य हेच खरे धन आहे. निरोगी नागरिक हेच कोणत्याही देशाचे खरे बळ असते. पण आजही अनेक आजार आपल्या समाजात पसरलेले आहेत, त्यांपैकी एक गंभीर आणि संसर्गजन्य आजार म्हणजे क्षयरोग (टीबी) होय. या आजाराचा नायनाट करण्यासाठी भारत सरकारने ' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका भराडे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाल्या '' क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. सतत खोकला येणे, ताप, वजन कमी होणे, अशक्तपणा ही याची प्...