पोस्ट्स

सप्टेंबर २४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

इमेज
विवेक पाणीभातेचा कॉलेज व ९ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सत्कार  सोलापूर प्रतिनिधी – दिनांक २४ सप्टेंबर – ९महाराष्ट्र बटालियन एनसीसी संलग्नित असलेले संगमेश्वर कॉलेजचा एनसीसी कॅडेट विवेक पाणीभातेची नवी दिल्ली येथे राष्ट्रीय थल सेना कॅम्प नवी दिल्ली येथे निवड झाली होती. महाराष्ट्रातून जवळपास १० एनसीसी कॅम्प मधून अतिशय खडतर प्रक्रियेतून एनसीसी कॅडेटची निवड होत असते. विवेक हा २० मे  ते १५ सप्टेंबर पर्यंत जवळपास चार महिने तो एनसीसीच्या कॅम्पमध्ये सहभागी होता. नवी दिल्ली येथे झालेल्या थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्राकडून १० एनसीसी कॅडेटची फायरिंग या प्रकारामध्ये निवड करण्यात आली होती त्यामध्ये विवेक पाणीभातेची निवड झाली होती. त्यामध्ये विवेक पाणीभाते याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. भारतामधील एकूण १७ एनसीसी संचालनालयापैकी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये विवेक पाणीभातेचे मोलाचे योगदान होते.राष्ट्रीय थल सेना कॅम्प, नवी दिल्ली या कॅम्पमध्ये निवड होणे ही एनसीसी मधील अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे.             त्याच्या य...