दैनंदिन आहारातील भरडधान्याचे महत्त्व ओळखा -- दिनेश क्षीरसागर (अन्नशास्त्रज्ञ )


संगमेश्वर कॉलेज व  कृषी विभाग यांचा संयुक्त उपक्रम 

सोलापूर (दिनांक 11 एप्रिल ) '' दैनंदिन आहारातील भरडधान्याचे महत्त्व ओळखा आणि विषमुक्त शेतीसाठी   आपल्या घरापासून सुरुवात करा. उत्तम आहार तेही नैसर्गिक आहार असेल तरच आपले यापुढील जीवन सुखकारक होईल.अन्यथा भविष्यातील मोठ्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.'' असे प्रतिपादन अन्नशास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी केलं. ते संगमेश्वर कॉलेज आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाककला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आयोजित केलेल्या मुख्य व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, मंडल कृषी अधिकारी कृष्णा थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त भरडधान्य पाककला महोत्सव आणि व्याख्यानाचे आयोजन केले होते .


                                प्रारंभी कृषी विभागाच्या वतीने प्रास्ताविक झाले आणि संगमेश्वर कॉलेज ,कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या या स्पर्धेचा आणि व्याख्यानाचा हेतू प्रा. शुभांगी गावंडे यांनी स्पष्ट केला . त्यानंतर अन्नशास्त्रज्ञांचे व्याख्यान झाले .  कृषी विभागाच्या वतीने बचत गटांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता याप्रसंगी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेचा निकाल महिला विभागातून प्रथम -  रेखा हनुमंत हजारे ( महिला बचत गट) द्वितीय - डॉ.आरती दिवटे (संगमेश्वर कॉलेज), तृतीय  - वैभवी मायनाळे ( संगमेश्वर कॉलेज ) ,उत्तेजनार्थ -  सौ वर्षा कांबळे ( महिला बचत गट) अनुक्रमे अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे आणि तीनशे रुपये प्रमाणपत्र देऊन यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये महिला आणि मुलींसोबत संगमेश्वर कॉलेजच्या शेतकरी मुलांनी देखील सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन प्रा. आरती दिवटे यांनी केले तर  प्रा. एस एस कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी  विज्ञान विभागातील प्रा.महानंदा बगले,प्रा.संगिता जोगदे,  प्रा. महेंद्र कावळे,प्रा.केशा गायकवाड,परीक्षक निवृत्त प्रा. डॉ.नेहा चक्रदेव, प्रा.ज्योती दुधनी,प्रा.संतोष पवार विद्यार्थी,महिला बचत गटाच्या महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा