संगमेश्वर कॉलेजमध्ये (AICRA ) पहिल्या रोबोटीक सेंटरची सुरुवात

 

सोलापूर ( शहर संचार प्रतिनिधी ) ऑल इंडिया कौन्सिल फॉर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन दिल्ली यांच्या मार्फत  संगमेश्वर कॉलेजमध्ये  (AICRA ) पहिल्या रोबोटीक सेंटरची सुरुवात झालीय. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतिनिमित्त संस्थेचे सचिव  धर्मराज काडादी साहेब यांच्या हस्ते स्किल सेंटरचे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स विभागात झाले. याप्रसंगी  श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, Suvi Instrument कंपनीचे  सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख डॉ.एस.एम. तोडकरी,शैक्षणिक सल्लागार विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद दर्गोपाटील,भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शुभांगी साळुंके,उपप्राचार्य प्रसाद कुंटेआदी मान्यवर उपस्थित होते.

 


AICRA ही एक केंद्रशासनाची रोबोटीक संदर्भात सर्व भारतातील शाळा, महाविदयालयामध्ये स्कील कोर्सेस राबवणारी संस्था आहे. तसेच या AICRA संस्थेमार्फत Suvi -Instrument होडगी रोड यांना रोबोटीक ॲन्ड ॲटोमेशन प्रशिक्षण देण्याकरीता सोलापूर जिल्हयासाठी प्रतिनिधी म्हणून नेमले आहे. या प्रसंगी बोलताना Suvi Instrument कंपनीचे प्रमुख डॉ.एस.एम. तोडकरी यांनी रोबोटीक,आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स क्षेत्रातील महत्व पटवून दिले. सध्या 5G इंटरनेट मुळे प्रचंड माहिती समोर येते, त्यातून उपयुक्त माहितीचा वापर नाव निर्मितीसाठी होतो. आपण जेंव्हा ई-कॉर्मस साईट वर माहितीचा शोध घेतो तेंव्हा  त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती आपल्या  कम्युनिकेशन साधनांमध्ये येतात आणि त्या कंपन्यांचे  प्रमोशन फोन देखील आपल्यापर्यंत पोहोचत असतात.तर हा एक डेटा सायन्स व आर्टिफिशल इंटेलिजन्सचा भाग आहे.'' असेही त्यांनी सांगितले.



 याप्रसंगी बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, '' बंगलोर सारख्या मोठया शहरात घरातील कामे करण्याकरीता रोबोट सारख्या मशिनचा वापर करण्यात येतो. ड्रोणच्या साहयाने शेती सुध्दा करण्यात येते. अश्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन ( इन्स्ट्रुमेंट्स) साधने बनवावीत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक्स  तंत्रज्ञान नक्कीच मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी  वापरात येणार आहे.  अभियांत्रिकेतील  ऑटोमेशन देखील यात यापूर्वीच आलेले आहे.  या सगळ्या गोष्टींचा विचार करून  नवतंत्रज्ञानाची कास धरण्याची विद्यार्थ्यांना गरज आहे.''



याप्रसंगी कॉलेजचे इलेक्ट्रॉनिक्सचे विभागप्रमुख प्राचार्य डॉ.आर.व्ही.देसाई म्हणाले की विदयार्थ्यांनी या स्कील सेंटरचा उपयोग करुन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळवावी. कॉलेजने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा.  याप्रसंगी सौ.एस.पी.कुलकर्णी, Suvi Instrument चे डॉ.पी.एम.गव्हाणे,डॉ.वैभव बच्चूवार,अमित जगधने तसेच महाविदयालयातील प्राध्यापक, शिक्षक,संशोधक विदयार्थीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पुष्पांजली म्हेत्री यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत प्रा.डॉ.संगिता जोगदे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी मानले.

 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा