जागतिक पोषण सप्ताहाच्या अनुषंगाने फ्रुट अँड व्हेजीटेबल कार्विंग स्पर्धा संपन्न


संगमेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र  प्रयोगशाळेचे अनावरण

सोलापूर ( दिनांक ८ ) रोजी संगमेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्रविभागमध्ये जागतिक पोषण सप्ताह निमित्त  फ्रुट अँड व्हेजीटेबल कार्विंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .  संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारात नवीन तयार करण्यात  आलेल्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचेही  अनावरण हि या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर. व्ही. देसाई  व संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोठे हे उपस्थित होते. 


 प्रयॊग शाळेचे अनावरण त्याच्या हस्ते करण्यात आले ,आजच्या फास्ट फूड च्या युगामध्ये दैनंदिन जीवनामधून कच्या  भाज्यांचा व फळांचा  वापर आहारातून कमी होत आहे . हि गोष्ट लक्षात घेऊन फळांना आणि भाज्यांना जर काही युक्त्या करून आकर्षक आणि चवदार बनवता येते व त्याचा वापर आहारामध्ये सहज करता येतो. भारतीय आहारशास्त्रानुसार आपल्या आहारातील किमान १/६ भाग आपण कच्या भाज्या व फळांचे सेवन केले पाहिजे त्यातील असणारी पोषक तत्वे आपणास बऱ्याच आजारांपासून लांब ठेवतात आणि एक निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतात हीच कल्पना केंद्रवर्ती ठेवून संगमेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र  विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बी .एस्सी . भाग १ ,२, व ३ मधील एकूण ३५  विद्यार्थ्यांनी सहभाग  नोंदविला तसेच कार्यक्रमासाठी ९५ इतर विद्यार्थ्यासहित अन्य शिक्षकांनी भेट दिली.   

कार्यक्रम चे सूत्र संचालन विभागातील विद्यार्थी  आफताब जमादार यांनी केले. या कार्यक्रमास व स्पर्धेस परीक्षक म्हणून इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका डॉ. जोगदे संगीता यांनी केले . या कार्यक्रमास प्राणिशास्त्र  विभाग प्रमुख डॉ. एम . बी . बगले , प्रा. एस .डी .शेख , प्रा.डॉ.वैभव बचूवार हे उपस्थित होते . स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र  विभाग प्रमुख डॉ. एस. एम .दहिटणेकर तसेच प्रा. डॉ .एस. व्ही खडतरे प्रा .डॉ . सौरभ जाधव , प्रा. संगीता शिंपी या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागाचे  शिक्षकेतर कर्मच्रारी श्री रेवणसिद्ध कोळी , श्री विनायक सारंगमठ  , श्री  मेघराज मंद्रुपकर यांचेही सहकार्य लाभले . 








































 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा