विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे – रजनीश जोशी

 

संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय  मंडळाचे उद्घाटन

सोलापूर दिनांक ६  भाषा ही मानवी जीवनातील महत्त्वाचे संवादसाधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो. बोलणे आणि लिहिणे ही भाषेची महत्त्वाची कार्ये आहेत. यातील लेखन ही कला असून लिपीच्या माध्यमातून ती साध्य् होत असते. सर्जनशील लेखनासाठी अंत: करणात प्रेरणा निर्माण व्हायला हवी. वाचनातून लेखनाचे संस्कार होता. लिहिण्याची उर्जा मिळते. इतरांच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही. परंतु त्याचे अनुकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे. असे विचार ज्येष्ठ पत्रकार व लेखक रजनीश जोशी यांनी मांडले.


संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मधील मराठी वाङ्‌मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य्‌, समाज आणि संस्कृती विषयी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा अभिजातपणा सांगितला. सोलापूरजवळील कुडलसंगम येथे असलेला शिलालेख हा मराठीच्या अभिजाततेचा पुरावा असून याअर्थाने मराठीच्या विकासात सोलापूरचे योगदान त्यांनी विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सोलापुरी साहित्याची परंपरा सांगितली. कॉलेज जीवनामध्ये मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात. यासाठी जास्तीत जास्त्‌ विद्यार्थ्यांनी मंडळाच्या कार्यक्रमात भाग घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पुजारी यांनी संगमेश्वर् कॉलेजमधील मराठी विभागाची परंपरा विशद केली. विद्यार्थीकेंद्री उपक्रम विभागाच्या वतीने राबविले जातात. यातून विद्यार्थ्यांची वाङ्मयीन जडणघडण होते. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मंडळाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. असे विचार त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय समन्वय्‌क डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले. वाङ्मय मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी मिनाक्षी बनसोडे, गायत्री मेत्रे, आनंद पक्षाळे, पुजा बनसोडे, राहुल मिनगुले, दिपाली राक्षे, माणकोजीराजे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. दत्ता सरगर यांनी तर आभार प्रा. सागर सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. संतोष पवार, डॉ. राजकुमार मोहरकर, डॉ. मेटकरी, डॉ. मुडेगावकर, प्रा. शिवराज पाटील आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा