वाचन हीच लेखनाची मूळ प्रेरणा – योगीराज वाघमारे

संगमेश्वरमध्ये ' वाचन प्रेरणा '  भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

सोलापूर: 

    कोणताही लेखक सहजासहजी घडत नाही. त्याला लेखन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत. चांगले ऐकणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच चांगले वाचणे सुध्दा महत्वाचे असते. यातूनच लेखन प्रेरणा मिळत असते. कॉलेज जीवनात भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून सुरू झालेले लेखन पुढे लेखक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे विचार ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केले.



संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्‌मय मंडळाच्या अंतर्गत वाचन प्रेरणा विशेषांक २०२३ या भित्तीपत्रिकेचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्र्‌पती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म्‌दिवस असून तो वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त् विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा ही भित्तीपत्रिका तयार केली होती. तिच्या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज वाघमारे उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र्‌ देसाई यांनी अध्यक्षस्थान भूषविले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघमारे यांनी आपल्या लेखनाची प्रेरणा सांगितली. मिलिंद कॉलेजमध्ये शिकत असताना हस्त्‌लिखित संपादन करण्याची जबाबदारी सांभाळत असताना लेखनाला सुरुवात केली. कथा, कादंबरी, कवितांचे लेखन केले. हीच खरी उर्जा होती. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. रायमाने अशा शिक्षकांनी लेखनासाठी मार्गदर्शन केले. अस्मितादर्श या त्रेमासिकातून कथा प्रकाशित झाल्यानंतर कथाकार म्हणून मान्यता मिळाली. कोणताही लेखक हा आपल्या लेखनाची सुरुवात छोटया घटकापासून करतो. तो घटक म्हणजे कॉलेजमधील भित्तीपत्रक होय. या भित्तीपत्रकांना विद्यार्थी जीवनात महत्त्वाचे स्थान असते. यातून विद्यार्थ्यांना लेखनाची उर्जा मिळते. चांगले लेखन करण्यासाठी चांगले वाचन आवश्य्‌क आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त्‌ वेळ वाचनात घालवावा. यातूनच त्यांना लेखनाची प्रेरणा मिळेल. असे विचार वाघमारे यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भित्तीपत्रिका ही आपल्या भावना, विचार मांडण्याचे हक्काचे ठिकाण असते. यातूनच चांगला लेखक घडू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न्‌ करावेत असे आवाहन केले. या प्रसंगी शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी, हिंदी विभागप्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. शिवाजी मस्के, प्रा. शहानुर शेख सर, डॉ. प्रवीण राजगुरू, डॉ. दत्ता सरगर, प्रा. सागर सुरवसे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वाङ्मय मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी माणकोजीराजे पाटील यांनी केले. आभार मण्यार यांनी मानले. या कार्यक्रमात आनंद पक्षाळे, पुजा बनसोडे, राहुल मिनगुले, दिपाली राक्षे, सुप्रिया कुंभार,         व्ह्‌नमाने, सिध्दार्थ ढोबळे तसेच इतर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा