संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्रात महत्वाचे - निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर


पदव्युत्तर  रसायनशास्त्र  विभाग आणि (सेंद्रीय रसायशास्त्र ) संशोधन प्रयोग शाळेचे उदघाटन 

सोलापूर प्रतिनिधी 

"आपण जे शिकलात ते कळलंय, कळलेलं प्रत्यक्ष कार्यात वापर करता येते का? आपल्याकडच्या परीक्षा त्यात पडलेले गुण यावरील संशोधन संस्थांचा विश्वास उडालेला आहे. म्हणून संशोधन संस्था स्वतंत्र परीक्षा घेतात. ही गरज का निर्माण झाली याचा शोध घेतल्यानंतर शिक्षण संस्थांमध्ये तयार होणारे पदवीधारक  या  सर्वांचे मशीन्स झाले आहेत. हे दुर्दैव आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृतीत  आणण्यामुळे संशोधकाला प्रोत्साहन मिळेल. आकलन, प्रात्यक्षिकातील ज्ञान यावर रसायनशाश्त्र संशोधनातील ज्ञान तपासले जाते. त्यामुळे प्रात्यक्षिकात अर्थात प्रॅक्टिकल्समधील तरुणांनाच रसायनशास्त्र संशोधनात संधी आहेत. भविष्यातील मिळालेल्या कालावधीचा वेध तुम्ही कसे घेता हे महत्त्वाचे आहे.संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्र संशोधनात महत्वाचे आहे हे जाणून घ्या " असे प्रतिपादन  निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर (बी. ए.आर.सी. व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)  यांनी केले.  ते  संगमेश्वर कॉलेजच्या  पदव्युत्तर  रसायनशास्त्र  विभाग आणि (सेंद्रीय रसायशास्त्र ) संशोधन प्रयोग शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी  सचिव धर्मराज काडादी माजी प्राचार्य आर.व्ही.अन्यापनवर,उपप्राचार्य डॉ.शुभांगी गावंडे,विभागप्रमुख यू. एम. मंडले आदी उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई होते.



 प्रारंभी संगमेश्वर गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. यू. एम. मंडले यांनी  प्रास्ताविक केले तर डॉ. दत्तकुमार म्हमाणे यांनी  पाहुण्यांची ओळख करून दिली.या प्रसंगी डॉ. प्रमोद दर्गोपाटील, कनिष्ठ विभागाचे प्राचार्य प्रसाद कुंटे, माजी उपप्राचार्य आनंद हुल्ली रसायशास्त्रात विभागातीलl सर्व विद्यार्थी, डॉ.केशा गायकवाड, डॉ.प्रतापसिंह गोरे -पाटील,डॉ.सय्यद,डॉ. मलिका शेख,डॉ.शमशाद मुल्ला, प्रा.अजुर, प्रयोगशाळा सहाय्यक उमेश ढवळे, नाशिगर,अंगडी,भडंगे उपस्थित होते.डॉ.आरती दिवटे,डॉ.पुष्पा मेत्री यांनी सूत्रसंचालन केले तर  प्रा.शाहनुर शेख यांनी सर्वांचे आभार मानले. 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा