वन्यजीवांसोबत जंगलांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी - भरत छेडा


वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान

सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी  


'' एखादे क्षेत्र जंगल मानण्यासाठी ते झाडांनी भरलेले असावेच असे नाही.  काही ठिकाणी स्थानिक वनस्पतींचा प्रकार विचारात न घेता, क्षेत्र कायदेशीररित्या जंगल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. एकंदरीत, जंगले हे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, झाडे, झुडपे आणि विविध प्रकारच्या वनस्पतींची वाढ आहे जी दुर्दैवाने दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे जंगलाचे संवर्धन ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे जी आपण सर्वांनी उचलली पाहिजे.वन्यजीवांसोबत जंगलांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी आहे.''  असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक भरत शेडा यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आणि नेचर कंजर्वेशन सर्कल सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ' वन्यजीव संरक्षण '   या  विषयाच्या   प्रबोधनपर कार्यक्रमात बोलत होते.  व्यासपीठावर विज्ञान विभाग प्रमुख विशाल जत्ती उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रमुख सुभाष पाटील यांनी केले.

                          विषारी बिनविषारी सापांपासून निसर्गातील वेगवेगळ्या जैवविविधतांचा धांडोळा घेत भरत छेडा यांनी रंजकतेने मुलांचे प्रबोधन केले ते पुढे म्हणाले की '' वेगवेगळ्या कीटकांपासून, सापांपासून ते  जंगली श्वापदापर्यंत वनक्षेत्रात राहणारा कोणताही सजीव वन्यजीवांशी संबंधित असतो.अगदीच सांगायचे झाल्यास वन्यजीव म्हणजे पाळीव नसलेल्या प्राण्यांच्या प्रजाती.  हे पावसाची जंगले, बोरियल जंगले, मैदाने, गवताळ प्रदेश, वाळवंट इत्यादी जवळजवळ सर्व परिसंस्थांमध्ये आढळते. वन्यजीव आपल्या पर्यावरणाला उत्तम स्थैर्य प्रदान करतात जेथे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक प्रक्रियांमध्ये गुंतलेले असतात. प्रत्येक सजीव अन्नसाखळीत ठेवला जातो आणि तितकाच महत्त्वाचा असतो, ते उत्पादक, ग्राहक किंवा विघटन करणारे असू शकतात, हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या अस्तित्वासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून वन्यजीवांचा अधिवास राखणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. '' याप्रसंगी   प्रशांत शिंपी, प्रशांत पाटील यांच्यासह विज्ञान शाखेतील  शिक्षक  कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे