साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे गैरसमजुतीतून मारू नका - अस्मिता बालगावकर


 ' साप- श्रद्धा व अंधश्रद्धा आणि त्याबद्दची मानसिकता '  या विषयावर व्याख्यान

सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी  

''सापाबद्दल काही अंधश्रद्धाही आहेत. यामध्ये नागाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात, साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप दूध पितो, असे गैरसमज लोकांमध्ये आहेत. तसेच विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो, अशी चुकीची समजूत आहे. साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही   साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे गैरसमजुतीतून मारू नका ''.  असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्ष आणि मानसोपचार तज्ञ अस्मिता बालगावकर यांनी केले.  त्या संगमेश्वर कॉलेज  कनिष्ठ विभाग मानसशास्त्र शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.



 प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रकाश कतनाळे यांनी करून दिला.  प्रमुख पाहुण्यांचा  सत्कार उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी केला. त्यानंतर समाजातील वेगवेगळ्या अंधश्रद्धा  यावर प्रकाश टाकत,  सापांचा अधिवास , बिनविषारी आणि विषारी साप , मौखिक परंपरा  यासंबंधी प्रबोधन करत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या  ''अंधश्रद्धेतून सापाची पूजा करू नका. सापाला हाताळू नका.  अघोरी बाबा बुवांकडून उपचार न घेता साप किंवा नाग चावल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रथमोपचार घ्या.प्रथमोपचार नंतर साप  चावलेल्या माणसाला प्रतिविषयाचे इंजेक्शन देणे गरजेचे असते तसे तज्ञ डॉक्टर उपचार करतील. साप शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो तो पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीला शेतात नांगर देखील चालवत नाहीत.''

सूत्रसंचालन रश्मी कन्नूरकर यांनी केले तर आभार रंगसिद्ध पाटील यांनी माले याप्रसंगी शिवशरण दुलंगे, शहाजी माने,शिवराज देसाई, हर्षवर्धन पाटील, मल्लिकार्जुन पाटील,संतोष पवार यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    












 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे