राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेत दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे श्रेया माशाळ विजेती
कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांची ११५ वी जयंती
सोलापूर (दिनांक १३)
दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. या स्पर्धेत दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनची श्रेया प्रभाकर माशाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रारंभी संगमेश्वर कॉलेजमध्ये उदघाटन सत्रात सकाळी ८.४५ वाजता कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा.डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते झाले.उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले. संतोष पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.
यावेळी बोलताना त्यांनी कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव पूर्ण उल्लेख करत आपले मनोगत व्यक्त केले. संगमेश्वरच्या बदलत्या स्थित्यंतराचाही त्याने आढावा घेतला आणि वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना त्यांनी मार्गदर्शन केले. प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वक्तृत्व स्पर्धेची परंपरा आणि कॉलेजची वाटचाल सांगत कर्मयोगी अप्पासाहेबांच्या ऐतिहासिक नोंदी सांगितल्या. शैक्षणिक सल्लागार प्रा.डॉ. प्रमोद दर्गोपाटील , उपप्राचार्य सुहास पुजारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, सर्व विभागाचे समन्वयक,कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बी. एन. पटणे, स्पर्धेचे समन्वयक प्रा. शिवराज पाटील यांच्यासह संगमेश्वर शिक्षण संकुलातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
उद्घाटन सत्रानंतर तर स्पर्धेस प्रारंभ झाला यावेळी राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील विषय वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले.
निकाल- प्रथम - श्रेया प्रभाकर माशाळ ( दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन) द्वितीय - सौरभ तुळशीराम वाघमारे ( वालचंद कॉलेज, सोलापूर) तृतीय- ऐश्वर्या अविनाश सुरडे ( सिंहगड इन्स्टिट्यूट,पुणे) चतुर्थ - समर्थ रमेश बंडगर (डॉ.डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी, पुणे) पाचवा क्रमांक- आकाश वसंता बोडखे ( श्री ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज,संगमनेर) सहावा क्रमांक - पर्जन्य नील अंजुटगी ( दयानंद कॉलेज, सोलापूर ) उत्तेजनार्थ - रोहित कल्याणी कोळी ( छ. शिवाजी कॉलेज , सोलापूर ) उत्तेजनार्थ द्वितीय - गायकवाड क्षितिजा किरण ( पी.बी.सुलाखे कॉलेज, बार्शी) विशेष प्रोत्साहनपर दीपांजली केसकर.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. दत्ता वाघमारे, प्रा.डॉ. लता बामणे, सेवासदनच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई यांनी केलं.विजेत्यांना अनुक्रमे प्रथम - २५०१ ,द्वितीय – १५०१ ,तृतीय – १०११ , चौथा – ७५१,पाचवा – ५५१ ,सहावा – ५०१ ,उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके ,प्रमाणपत्र देऊन देऊन निकाल सत्रात प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य सुहास पुजारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्रात परीक्षक प्रा.डॉ. लता बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की,'' विद्यार्थ्यांनी समाज भान ठेवून वाचन केले पाहिजे. सातत्यपूर्ण वाचनानेच आपण प्रगल्भ होतो आणि मिळालेला विषय आपण ताकदीने मांडू शकतो. या स्पर्धेत मांडलेले विषय हे बुद्धीला चालना देणारे होते.''
स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा. राजकुमार खिलारे, प्रा. शीला रामपुरे डॉ. मंजू संगेपाग, प्रा.एस बी निंबर्गी, प्रा.डॉ.राजकुमार मोहरकर, प्रा.तेजश्री तळे, संगीता म्हमाणे,रविशंकर कुंभार आदींनी सहकार्य केले.सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी केले तर आभार प्रा. बी. एन. पटणे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा